
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे करतील उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करतील, अशी माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
ममता बॅनर्जी यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र, केली 'ही' मागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पूर्व रेल्वेच्या हावडा विभागातील कटवा - अझीमगंज विभागातील जुने रेल्वे भाडे पूर्ववत करण्यासाठी पत्र लिहिले आहे जे महामारीच्या काळात रु. 10/- वरून रु. 30/- करण्यात आले होते. : पश्चिम बंगाल सरकार
काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल
- काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल
- त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश वादा नंतर हुसेन दलवाई माहिती घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल
- मंदिराच्या उत्तर दरवाजा समोरून दर्शन घेत केली पाहणी
- बाहेरूनच दलवाई यांनी घेतले दर्शन दलवाई दरवाजा समोर येताच सुरक्षा रक्षकांनी लावले गेट
- मी आता जाणार नाही बाहेरूनच दर्शन घेणार असल्याचे दलवाई यांनी सांगित
LIVE Latest Marathi News Updates: भारत जगात पहिल्या स्थानावर उभा आहे - जे. पी. नड्डा
भारत जगात पहिल्या स्थानासह उभा आहे. पंतप्रधानांनी 60 देशांना भेटी दिल्या. ते इस्रायलला गेले पॅलेस्टाईनलाही गेले. आज नेपाळमध्ये भूकंप झाला तर भारत नेपाळ सरकारसोबत उभा आहे - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा
मिठी नदीच्या स्वच्छतेला आजपासून सुरुवात होत - एकनाथ शिंदे
मिठी नदीच्या स्वच्छतेला आजपासून सुरुवात होत आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मातोश्रीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू...
मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक सुरू आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी
तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांना ड्रेस कोड शिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे काही पुजारी तुळजाभवानी मंदिरा परिसरात जीन्स आणि शर्ट घालून फिरत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर याप्रकरणी मंदिर प्रशासनाने नोटीस काढत सदरील नोटीस मंदिर परिसरातील भिंतीवरती लावल्या आहेत.
ओडिशातील पहिल्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
पुरी आणि हावडा दरम्यान ओडिशातील पहिल्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
विद्यार्थांसाठी महत्त्वाची माहिती ११ वी प्रवेश प्रक्रिया २५ मे पासून सुरू
सिद्धरमय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री
सिद्धरमय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. याची घोषणा काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं- काँग्रेस खासदार
मी पूर्णपणे आनंदी नाही पण कर्नाटकच्या हितासाठी आम्हाला आमची वचनबद्धता पूर्ण करायची होती...म्हणूनच डीके शिवकुमार यांना स्वीकारावे लागले. भविष्यात आपण पाहणार आहोत, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ...माझी इच्छा होती (डीके शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद) पण तसे झाले नाही, आम्ही वाट बघू: काँग्रेस खासदार आणि डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश
बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा! सुप्रीम कोर्टाने दाखवला हिरवा कंदील
बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाने दिली आहे.
फक्त स्किल नाही तर.. जे पी नड्डा यांनी युवकांना केले मार्गदर्शन
काळाप्रमाणे स्वतःला बदलण गरजेचं आहे. आजचं जग हे क्षणाला बदलत असतं. कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. फक्त स्किल नाही तर रि-स्किल करणही गरजेंचं आहे. नोकरीच्या गरजेनुसार स्वतःमध्ये बदल केला पाहिजे.
जे पी नड्डा म्हणजे शब्दाचे पक्के; CM शिंदेंनी केले कौतुक
युवा शक्ती करिअर शिबीराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे कौतुक केले. जे पी नड्डा म्हणजे शब्दाचे पक्के, असं मोठं वक्तव्य शिंदे यांनी यावेळी केलं. तसेच, मोदींच्या नेतृत्वात भाजप पुढे जात आहे. मोदींनी युवाशक्तीची ताकद ओळखली. तरुणांच्या हाताला काम मिळणं गरजेचं. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे.
“तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात, मुंबईचा तुमचा काही संबध नाही”- संजय राऊत
तुम्ही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. मुंबईत येऊन लुडबुड करू नका. मुंबई ताब्यात घेण्यासाठी तुम्ही प्रचंड प्रयत्न सुरू आहेत बेकायदेशीर मार्गाने. कर्नाटक तुम्ही का हरलात, यावर तुम्ही बोलायला हवं. कर्नाटक हे भाजपाच्या काळातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार होतं. मिस्टर ४० परसेंट असं तिथल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना म्हणत होते.
यावर त्यांनी बोलायला हवं. संरक्षण खात्यात हेरगिरीची प्रकरणं वाढली आहेत. यावर नड्डांनी बोलावं. शिंदे-फडणवीस सरकारनं किती हजार कोटींचा भ्रष्टाचार केला याची प्रकरणं मी त्यांना पाठवून देईन. त्यावर त्यांनी बोलावं अशी टीका संजय राऊत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या दौऱ्यावर केली आहे.
किरेन रिजीजू यांना कायदा मंत्रीपदावरून हटवलं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. कायदेमंत्री म्हणून रिजीजू यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.
कायदेमंत्री पदावरून किरेन रिजिजू यांना हटवलं
कायदेमंत्री पदावरून किरेन रिजिजू यांना हटवलं असून आता अर्जुन राम मेघवाल यांना हे अतिरिक्त पद देण्यात आलं आहे. किरेन रिजिजू यांना या पदावरून का हटवलं याचं कारण अस्पष्ट आहे.
रक्तपात करण्याचं काम राज्यात सुरू आहे - नाना पटोले
बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 14 जखमी
मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 14 जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
२६/११ मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार, अमेरिकन कोर्टाने दिली मंजुरी
मुंबईमध्ये २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी वाँटेड असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वूर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास कॅलिफोर्नियातील अमेरिकन न्यायालयाने परवानगी दिली आहे. १० जून २०२० रोजी भारताने ६२ वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यता दिली.
PM नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय भाजप खासदार रतनलाल कटारिया यांचे निधन
हरियाणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार रतनलाल कटारिया यांचे निधन झाले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कटारिया हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना चंदीगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर