दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर... Maharashtra live blog updates 21 February politics sports traffic railway weather crime shivsena Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पुणे नगर महामार्गावर फलके मळ्यानजीक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अपघात दोन वर्षाच्या लहान मुलीसह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सत्यजीत तांबे पुण्यात आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीला

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली.

माझ्यावर लवकरच हल्ला करण्याचा प्रयत्न ; संजय राऊत यांचा आरोप

उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या उपसंचालकाची मुंबईत आत्महत्या

उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाच्या उप संचालकांनी मुंबईत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. विमलेश औदिच्य असे या अधिकाऱ्याचे नाव असून मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचलीये.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज बैठक! शिंदे पक्षप्रमुखपद स्विकारणार?

निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची आज बैठक होणार आहे.

सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली

सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली आहे. उर्वरित सुनावणी उद्या होणार आहे. आज पूर्ण दिवस ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. दोन्ही गटाला लेखील युक्तिवागद सादर करा, अशी सुचना न्यायालयाने दिली आहे.

निवडणूक आयोगाने दुसरी बाजू गृहीत न धरता निर्णय दिला - कपिल सिब्बल

निवडणूक आयोगाने दुसरी बाजू गृहीत न धरता निर्णय दिला. विधान परिषदेच्या सर्व आमदारांच ठाकरे गटाला समर्थन आहे, असे सिब्बल म्हणाले.

श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली - संजय राऊत

संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची धमकी दिली असा आरोप केला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहले आहे.

राहुल नार्वेकरांच्या निवडीवर ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

विधानसभा अध्यक्षांची निवड चुकीची आहे. नार्वेकरांच्या निवडीत शिंदे गटाने व्हीपचं उल्लंघन केलं. तसेच त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा आहे, असे सिब्बल म्हणाले. यावर नार्वेकर बहुमतात निवडून आले, त्यावर युक्तिवाद नको, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

सतासांघर्षावर सुप्रीम कोर्टात घमासान सुरू 

दहाव्या सूचीतील तरतुदींचा वापर सरकार पाडण्यासाठी - सिब्बल

शिंदे गटाला वगळलं तरी नार्वेकर बहुमतात निवडुन आले- कौल

शिंदे गटाला वगळलं तरी नार्वेकर बहुमतात निवडुन आले- कौल

राहुल नार्वेकरांच्या निवडीवर चर्चाच नको - सिब्बल

नार्वेकरांना बहुमतापेक्षा एक मत कमी पडलं - सिब्बल

कपिल सिब्बल यांच्या प्रश्नावर शिंदे गटाचं उत्तर

ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाचे गविक कौल आणि जेठमलानी यांचा युक्तिवाद आता सुरू आहे ते कपिल सिब्बल यांच्या प्रश्नावर उत्तरे देत आहेत.

अजित पवारांनी घेतली नीलम गोऱ्हे यांची सांत्वनपर भेट

विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिकाताई गोऱ्हे यांचे काल (सोमवार) निधन झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेते नीलम गोऱ्हे यांची सांत्वनपर भेट घेतली.

दुसऱ्या राज्यात बसून एकनाथ शिंदे मुख्य नेते कसे बनले - सिब्बल 

संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाकडे 

संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाकडे गेल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यपालांनी राजकारण करणं दुर्देवी- कपिल सिब्बल

पक्षांतर्ग वादाची समीक्षा कोर्टाकडून होऊ शकते का? -सिब्बल 

संविधानच रक्षण करण हे राज्यपालांचं काम - सिब्बल  

 16 सदस्यांच्या आपत्रतेवर कारवाई व्हावी असं सिब्बल यांनी म्हंटलं आहे. 

बहुमताने प्रतोद बदलता येतो का? कपिल सिब्बल यांचा प्रश्न 

आधी सदस्यांच्या आपत्रतेबाबत निर्णय व्हावा - कपिल सिब्बल 

ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांचे काही प्रश्न 

पक्षात 2 गट झाल्याने चिन्हाच प्रकरण आयोगाकडे पाठवणं योग्य नाही. त्यामुळे पक्षचिन्हं कोणाकडे जाईल. निवडणूक आयोगाची या प्रकरणात भूमिका काय आहे. असे प्रश्न ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केले आहेत.

पक्षात 2 गट झाल्याने चिन्हाच प्रकरण आयोगाकडे पाठवणं योग्य नाही 

निवडणूक आयोगाची या प्रकरणात भूमिका काय? - कपिल सिब्बल 

पक्षात 2 गट झाल्याने चिन्हाच प्रकरण आयोगाकडे पाठवणं योग्य नाही - कपिल सिब्बल

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू आहे.

सभागृहाबाहेर व्हीप बजावला ज्याच पालन सभागृहात व्हायला हवं होतं.

अपात्रतेची तलवार असेल तर राज्यपाल शपथ देऊ शकतात का?

लोकशाही मार्गाने आलेलं सरकार पाडण्यात आलं.

राज्यपालांकडून त्यांनाच शपथ देण्यात आली.

अध्यक्षांकडे न जाता कोर्ट याचा निर्णय देऊ शकत का?

ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या 3.30 वाजता सुनावणी

ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या 3.30 वाजता सुनावणी होणार आहे.

 MPSC आंदोलक विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा 

 MPSC आंदोलक विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा केली आहे. त्यांनी विद्यार्थ्याना अश्वस्त केलं आहे.

झारखंड सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातील अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित देशभरात 24 ठिकाणी ED चे छापे

अंमलबजावणी संचालनालय झारखंड सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातील अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित असलेल्या रांचीसह देशभरात 24 ठिकाणी छापे टाकत आहे.

भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस

भाजपच्या चिंचवडमधील उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज प्रकरणामध्ये ही नोटीस धाडली आहे. जगताप यांच्याकडून आयोगाने लेखी उत्तर मागवले आहे. अश्विनी जगताप यांनी याबाबत खुलासाही पाठवला आहे. आता या उत्तराची पडताळणी आयोगाच्या विशेष समितीमार्फत सुरु आहे.

मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी कसून तपास सुरु केला. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.


CM शिंदे पक्षप्रमुख पद स्वीकारणार? आज राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक

एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्विकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.


राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.


देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर