आज दिवसभरात झालेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर Maharashtra live blog updates 26 January politics sports traffic railway weather crime Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

आज दिवसभरात झालेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई-दादर पूर्वमधील R A रेसिडेंसी टॉवरच्या २२व्या मजल्याला आग

मुंबई-दादर पूर्वमधील R A रेसिडेंसी टॉवरच्या २२व्या मजल्याला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. इमारतीतील इलेक्ट्रिक पॅनलला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी उद्या पुण्यात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभ होणार आहे. हा राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ सोहळा होणार आहे.

कुलपती या नात्याने राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्याना पदवी प्रदान करण्यात येणार असून हा पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२१ वा पदवीप्रदान समारंभ असणार आहे. या समारंभात एकूण 938 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात येणार तर काही विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी पाठवण्यात येणार आहे.

बजेटपूर्वी पार पडली 'हलवा सेरेमनी'

दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 संबंधीच्या दस्तऐवज छपाईच्या प्रारंभानिमित्त आयोजित हलवा समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत किशनराव कराड, वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात स्वारगेट परिसरात असणाऱ्या दुकानांना मोठी आज

पुण्यात स्वारगेट येथे भंगार दुकानाला मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे सहा वाहने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग्नीशमन दलाच्या सहा वाहने दाखल झाली आहेत. ३ दुकाने आगीच्या भक्षस्थानी असून अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

साकीनाका येथील वायर गल्लीमध्ये भीषण आग

साकीनाका येथे वायर गल्लीतील चार गोदामांना आग लागली आहे. घटनास्थळी अग्नीशामक दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या आहेत. अद्याप आगीच कारण समजलेलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

ठाण्यात ठाकरे गटाचं जोरदार शक्तिप्रदर्शन 

उद्धव ठाकरे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, राजन विचारे देखील आहेत. ठाकरे गटाने यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाण्याच्या दौऱ्यावर 

उद्धव ठाकरे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, राजन विचारे देखील आहेत.

Dunzo ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीत नोकरीचे आमिष दाखवत २६ वर्षीय महिलेवर बलात्कार

डंझो या ऑनलाईन डिलिव्हरी ॲप या कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत २६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्कार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेकडून मागितली १ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना घडली आहे. डंझो ही ऑनलाइन सामानाची डिलीवरी करणारी कंपनी सध्या भारतातील अनेक शहरात कार्यरत आहे. या प्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रजासत्ताक दिनी मंत्रालयासमोर तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जासत्ताक दिनाचा उत्साह एकीकडे सुरू आहे. तर दुसरीकडे, राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयासमोर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण, वेळीच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

खांबाटकी घाटात वाहनांच्या रांगा

सातारा पुणे मार्गावर खांबाटकी घाटात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. २६ जानेवारी सुट्टी निम्मित वाहनांची मोठी गर्दी झाली. मुंबई हून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एक्स्प्रेस वेवर खंडाळा जवळ वाहतूक मंद गतीने सुरु आहे. मुंबई हून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी सकाळपासूनच वाहनांची गर्दी लागली आहे. तर विकेंड आणि एक दिवस सुट्टी लागून असल्यामुळे बाहेर फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे वाहनांची गर्दी झाली आहे.

नागपुरमधील RSS मुख्यालयात ध्वजारोहण

आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्ताने नागपूर येथील संघ मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. RSS नागपूरचे महानगरचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे.

दादर चौपाटीवर मॅरेथॉन, मिलिंद सोमणकडून हिरवा झेंडा

मॅरेथॉनला मिलिंद सोमण यांनी दाखवला हिरवा झेंडा दाखवला आहे. हातात तिरंगा घेऊन यावेळी महिला हातात तिरंगा घेऊन धावल्या.

इस्रायली दूतावासाने भारताला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा

इस्रायली दूतावासाने भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘एकजुटीने पुढे जाऊया’, प्रजासत्ताक दिनी मोदींचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. "प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. कारण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. देशातील महान स्वातंत्र्य सेनानींच स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने पुढे जाऊया" असं मोदींनी या टि्वटमध्ये म्हंटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी CM शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहन

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर