दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
LIVE Update
LIVE Update

अंबानी, बच्चन आणि धर्मेंद्र यांचे घर उडवण्याची धमकी

अंबानी, बच्चन आणि धर्मेंद्र यांचे घर उडवण्याची धमकी आली आहे. धमकीचा फोन आल्याने नागपूर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समिती गठित

अधिवेशनातही कांद्याच्या दरांचा प्रश्न चर्चिला गेला आहे. यानंतर आता राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समिती गठित केली आहे.

मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा केजरीवालांनी स्वीकारला

मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे. मनीष सिसोदिया यांना दिल्लीच्या नवीन उत्पादन शुल्क धोरण (२०२१-२२) घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती, त्यानंतर सोमवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची (४ मार्चपर्यंत) सीबीआय कोठडी मंजूर केली. तर सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते तिहार तुरुंगात आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्याचे सरकारचे आश्वासन

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्याचे सरकारचे आश्वासन शिंदे-फडणवीस सरकारने दिले आहे. महिन्याच्या ७ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे.

माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपात प्रवेश

शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, तोशाखाना प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तोशाखाना प्रकरणात त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा सुनावणी होणार!

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील आजची सुनावणी संपली आहे. उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

अभिषेक मनु सिंघवी यांचा राज्यपालांचा अधिकारावर सवाल

ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यपालांच्या अधिकारावर सावाल उपस्थित केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीचं आझाद मैदानामध्ये उपोषण सुरु

चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते आंदोलनस्थळी दाखल

राणा प्रकरणाचा विरोधकांकडून चुकीचा अर्थ लावला जात आहे- कौल

शिंदे गटाने उद्या युक्तिवाद संपवावा - सरन्यायाधीश 

याच आठवड्यात युक्तिवाद संपवायचा - सरन्यायाधीश 

राजकीय पक्षांचे निर्णय त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जाहीर होतात - देवदत्त कामत

व्हीपची नियुक्ती करणं हे संसदीय काम नाही - देवदत्त कामत

प्रतोद नियुक्त करणं हे संसदीय प्रणालीच काम नाही. मुळात हे सगळं प्रकरण प्रक्रियेमधील गैरव्यवहाराचं नसून प्रत्यक्ष राज्यघटनेच्या उल्लंघनाचं आहे 

एकनाथ शिंदेंच्या पत्राचा कामतांनी दिला दाखला

एकनाथ शिंदेंच्या एका पत्राच्या आधारावर विधानसभा अध्यक्षांनी सुनील प्रभू यांच्याऐवजी भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती झाल्याच्या निर्णयाला मान्यता दिली

भरत गोगावलेंनी पाठवलेलं पत्र पक्षाचं नव्हतं - देवदत्त कामत

भरत गोगावलेंनी सुनील प्रभूंना ३ जुलै रोजी पाठवलेलं पत्र राजकीय पक्ष म्हणून पाठवलं नव्हतं. 

राज्यपालांनी दहाव्या सूचीचा निर्णय घ्यायला हवा होता- कामत 

देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू 

ठाकरे गटाचे वकील वकील मनु सिंघवी यांचा युक्तिवाद संपला 

विधान परिषद 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे 

10 व्या सूचीतील अधिकारांचा गैरवापर; मनु सिंघवी यांचा युक्तिवाद

10 व्या सूचीतील अधिकारांची कक्षा ठरवावी

सिंघवींकडून श्रीमंत पाटील केसचा दाखला

अपात्र झाल्यास पुन्हा निवडणूक लढवावी लागते

आमदार अपात्र झाल्यास मंत्रीपदाची शपथ घेता येत नाही

आपत्रतेची कारवाई झाल्यास पुन्हा निवडणुका लढवावी लागते - अभिषेक मनु सिंघवी

राज्यपालांनी राजकीय हेतूने निर्णय घेतले – अभिषेक मनु सिंघवी

सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या विरोधात अनादर नोटीस काढावी. राज्यपालांनी राजकीय हेतूने निर्णय घेतले. मविआ सरकार पाडण्यासाठी राज्यपालांच्या हालचाली होत्या

मनु सिंघवी यांच्याकडून किहोटो केसचा दाखला 

इतर कोणी निर्णय घेण्यापेक्षा याच कोर्टाने निर्णय घ्यावा - सिंघवी 

राज्यपालांनी ठाकरेंना लिहलेल्या पत्राचं कोर्टात वाचन

पक्षातील फुटीला राज्यपालांकडून मान्यता दिली गेली नाही - सिंघवी 

आपत्रतेचा निर्णय झालेला नसताना राज्यपालांनी निर्णय घेतल्याचं ऐकिवात नाही - सिंघवी 

घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून झालेली ही चूक - मनु सिंघवी 

ठाकरे गटाचे वकील मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू 

सिसोदियांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची सहमती

मनीष सिसोदिया यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्ट सहमत आहे

कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठिशी सरकार ठाम

विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी कांदा आणि कापसाच्या दराचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नसून सरकार कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठिशी ठाम असल्याचं नमूद केलं. तसेच, सरकार कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले उपमुख्यमंत्री 

मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री पुढे सरसावल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले त्यानंतर त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना विरोधकांनी गोंधळ घालायला सुरवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री उठले आणि त्यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील सरकारं हे शेतकऱ्यांचे सरकार- एकनाथ शिंदे

राज्यातील सरकारं हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्याला जी मदत लागेल ती मदत सरकार करेल. कांद्याची खरेदी नाफेडने सुरु केली. निर्यातीवर कुठलीही बंदी घातलेली नाही.

कांद्याप्रश्नी केंद्र सरकारसोबत चर्चा करावी; भुजबळांची मागणी

कांद्याच्या निर्णयाला परवानगी द्यावी. केंद्र सरकारसोबत बोलून कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढावा. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. नाफेडनं कांदा खरेदीला सुरुवात केली तर दर स्थिर राहिलं.

कांदा प्रश्नावरुन अजित पवार आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज चर्चा घ्यावी. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे. सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा. अशी मागणी अजित पवार यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केली.

महाविकास आघाडीच्या बैठक

महाविकास आघाडीच्या बैठकीला विधान भवनात सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात अजय चौधरी, अंबादास दानवे, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे उपस्थित आहेत. आज दिवसभरातील कामकाजबाबात आणि विरोधी पक्षाच्या रणनीती बाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिवसभर विरोधक आक्रमक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सरकारने झोपेचं सोंग घेतलंय, त्यांना जागवायचं आहे- सुनील प्रभु

मनीष सिसोदिया यांची अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या अटकेला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आज सुप्रीम कोर्टामध्ये केली जाण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कादयांनी भरलेल्या टोपल्या डोक्यावर घेऊन विधानभवनाच्या बाहेर आंदोलन केनयात येत आहे.

बेलापुर खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डब्बे घसरले 

बेलापुर खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डब्बे घसरले आहेत. नेरूळहून खार कोपरला येणारी लोकल सेवा बंद झाली आहे. डब्बे रुळावर ठेवण्याचे काम सुरू आहे. अपघातात कोणतीही जीवित हानी नाही.

कसबा विधानसभा मतदारसंघात निकाला आधीच विजयाची बॅनरबाजी

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. पुण्याच्या सारस बागेजवळ बॅनर लावले होते ज्यात त्यांचा उल्लेख आमदार असा करण्यात आला होता. रात्रीतून हे बॅनर काढण्यात आले आहेत.

पुण्यात उद्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

पुण्यात उद्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन करणार आहेत. एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. राज्य भरातून विद्यार्थी उद्या पुण्यात येणार असून ते पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थी उपोषणाला बसणार आहेत. सरकार जाणून बुजून आम्हाला त्रास देत असल्याचं विद्यार्थ्यांच म्हणणं आहे. सरकारने ताट वाढलं पण ते रिकामे ठेवलं असं विद्यार्थी म्हणत आहेत. तर यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असून आम्ही आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हंटलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी, वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com