
दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
धक्कादायक! ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आलेल्या तरूणाचा मुलाचा मृत्यू
कोल्हापूरमधील करवीर तालुक्यामधील सडोली दुमालात गावातील संग्राम सीताराव गुरव सडोली दुमालातील वार्ड नंबर 3 मधून संग्रामची बिनविरोध निवड झाली होती. संग्रामची प्रकृती आणखीनच खालावली त्यानंतर त्याला उपचारासाठी त्याला कोल्हापूरमधील रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला डेंग्यू आणि काविळ झाल्याचं समोर आलं. उपचारादरम्यान संग्रामची प्रकृती खालावत गेली आणि अखेर संग्रामचा मृत्यू झाला.
जेलमधून बाहेर येताच अनिल देशमुख यांच्या पत्नीला अश्रू अनावर
अनिल देशमुख यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर ते आज आपल्या पत्नीला भेटले. या भेटीवेळी देशमुख दाम्पत्य भावूक झाल्याचं पाहिला मिळालं. देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख यांना रडू कोसळलं.
अनिल देशमुख जेल मधून बाहेर येताच सिध्दी विनायकाच्या दर्शनाला दाखल
अनिल देशमुख जेल मधून बाहेर येताच सिध्दी विनायकाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत १३ महिन्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आर्थर जेल मधून बाहेर आले आहेत मागच्या नोव्हेंबरमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. अनेक महिन्यानंतर देशमुख बाहेर आले आहेत त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये चांगलच आनंदाच वातावरण आहे.
मुबंई महापालिकेत शिंदे-ठाकरे गटात राडा
मुबंई महापालिकेत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाल्याची माहिती मिळत आहे. पालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाने दावा केल्याने हा राडा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान दोन्ही गटामध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
१३ महिन्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आर्थर जेल मधून बाहेर
१३ महिन्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आर्थर जेल मधून बाहेर आले आहेत मागच्या नोव्हेंबरमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. अनेक महिन्यानंतर देशमुख बाहेर आले आहेत त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये चांगलच आनंदाच वातावरण आहे.
आर्थर जेल बाहेर अजित पवार, छगन भुजबळ दाखल; अनिल देशमुख जेलमधून येणार बाहेर
आर्थर जेल बाहेर अजित पवार, छगन भुजबळ दाखल; अनिल देशमुख जेलमधून येणार बाहेर दाखल झाले आहेत. त्याच बरोबर जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि जेष्ठ नेते दाखल झाले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या आईची प्रकृती खालावली; भेटीसाठी रूग्णालयात मोदी दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. काल रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर आज नरेंद्र मोदी भेटीसाठी रूग्णालयात दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीचे मोठे नेते मुंबईत दाखल; थोड्याच वेळात अनिल देशमुख बाहेर येणार
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल देशमुखांची आज जेल मधून सुटका होणार आहे. त्यांमुळे पक्षात आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या स्वागतासाठी पक्षातील नेते आले आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधातील पुरावे घेऊन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. आणि राहुल शेवाळे यांच्या विरोधातील पुरावे देत गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिझान खानच्या पोलिस कोठडीत वाढ
बावनकुळेंचा अजित पवारांवर पलटवार; २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करणार
बारामतीतील माझ्या एका दौ-यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रमाची भाशा बोलत आहे. प्रत्यक्षात कुणाचा कार्यक्रम करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल. २०२४ च्या निवडणुकीत अजित दादांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे दावाभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते.बावनकुळेंचा अजित पवारांवर पलटवार; २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करणार
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपुरात रूपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्यावर FIR झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री यांना पुराव्यासह निवेदन दिले आहे.
लोकायुक्त विधेयक विधानसभेत संमत
यापूर्वीचा लोकायुक्ताचा कायदा १९७१ आहे. या कायद्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियममध्ये सामाविष्ट नव्हता. या कायद्यामुळे आपण मुख्यमंत्री, मंत्री किंवा लोकप्रतिनीधी यांनाही लोकायुक्तांच्यां अंतर्गत आणले आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणी लोकायुक्त कारवाई करू शकतात.
१५० एकर जमिनीचा घोटाळा काढणार : आव्हाड
उद्या १५० एकर जमिनीचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. उद्या एक घोटाळा काढणार आहे. त्याला बॉम्ब स्फोट म्हणणार नाही. हायड्रोजन बॉम्ब फोडला तरी हे सरकार उठणार नाही. सरकार कुंभकर्णी झोपेत आहे, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत केली घोषणा
TET घोटाळ्याची होणार चौकशी
अपात्र केलेल्या कंपन्यांना पात्र करून परीक्षा घेण्याची परवानगी दिली
या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी होणार ,कडक कारवाई करणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत केली घोषणा
मंत्र्याच्या घोटाळ्याबाबत सरकार निर्णय घेत नसल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांचा सभात्याग
अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणविसांचं उत्तर
अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. मंत्र्याच्या घोटाळ्याबाबत सरकार निर्णय घेत नसल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांचा सभात्याग केला आहे
कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून १ जानेवारी रोजी कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असतात. यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
३१ डिसेंबर सायंकाळी ०९ ते १ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान येथून ४० बसेस व फाटा (इनामदार हॉस्पिटल) ते वढू करिता ५ बसेस व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते भिमा कोरेगांव पर्यंत ३५ बसेस अशा एकूण ८० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात येत आहे.
१ जानेवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, फुलगाव शाळा ते पेरणे टोल नाका पर्यंत १४० बसेस व शिक्रापूर रोड ( तोरणा हॉटिल) ते भिमा कोरेगांव पर्यंत ११५ बसेस आणि बहू फाटा ते वढू पर्यंत २५ बसेस अशा एकूण २८० मोफत (विनातिकिट) नियोजन करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध स्थानकांवरून प्रवास भाडे आकारणी करून जादा बसेसचे नियोजन देखील करण्यात आले आहे
पुणे स्टेशन बस स्थानक: ३८ बसेस
मनपा: ३५ बसेस
दापोडी आणि ढोले पाटील: २ बसेस
अप्पर डेपो: ४ बसेस
पिंपरी आंबेडकर चौक: ३ बसेस
भोसरी: ४ बसेस
हडपसर: २ बसेस
हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरलाच संपणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन नियोजित काळातच होणार आहे.१९ डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात नेत्यांचे घोटाळे, त्यांच्यावरचे आरोप प्रत्यारोप या विषयांवरच मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्यामुळे जनतेचे प्रश्न मागे पडल्याची भावना विरोधकांनी व्यक्त केली.
'..तर आमचीही तयारी अधिवेशन कालावधी वाढवायची होती' : प्रवीण दरेकर
संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत अधिवेशन ३० तारखेपर्यंत घेण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय विरोधकांच्या समन्वयाने झाला आहे. विरोधकांची मानसिकता अधिवेशन कालावधी वाढवण्याची असती तर आमचीही तयारी होती. परंतु, ३० तारखेपर्यंत अधिवेशन आटोपण्याचा निर्णय विरोधकांच्या समन्वयाने झाला असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडीची निदर्शने
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडीचे निदर्शने विधान भवन पायऱ्यांवर यावेळी नागपूर ची संत्री भ्रष्ट्र व चोर आहे मंत्री हा नारा दिला गेला तेही संत्रे हातात घेऊन सोबत दिल मांगे मोर सत्तार आहे चोर हा नारही होताच .
NCP शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा पक्षातील मंडळींना घरचा आहेर
कसबा विधानसभा निवडणुकीबद्दल कुठलीही चर्चा सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. ज्यांचा दशक्रिया विधी अजून झाला नाही आणि त्याबाबत अशी चर्चा करणे म्हणजे एक पुणेकर म्हणून लाज वाटते, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार
प्रदेशद्याक्ष जयंत पाटील,खासदार सुप्रिया सुळे आर्थर रोड तुरुंग बाहेर उपस्थित राहणार आहेत. अनिल देशमुख बाहेर आल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणार आहेत. ते बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बाईक रॅली काढणार आहे.
अधिवेशनाचा कालावधी आठवडाभरानं वाढवण्यात यावा : अजित पवार
अधिवेशनाचा कालावधी आठवडाभरानं वाढवण्यात यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
पुणेकरांची चिंता वाढली! विमानतळावर उतरलेला रुग्ण कोरोनाबाधित
कोरोनाने पुन्हा एकदा जगभराची चिंता वाढवली आहे. सर्व देशांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. भारतातही केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच आता पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेला 1 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे. विमानतळावर या व्यक्तीची कोरोनाचाचणी करण्यात आली. कोरोना तपासणीसाठी नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे ५४ सक्रिय रुग्ण आहेत.
पुण्यातील मंडई परिसरात तरुणावर गोळीबार
पुणे महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर कोयत्याने वार करत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करुन कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली माहिती आहे. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.