Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर... |LIVE Marathi News Updates Maharashtra Breaking News | Maharashtra live blog updates 30 May politics sports traffic railway weather crime Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

esakal Breaking News

Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

घाटकोपर परिसरातील 28 मजली इमारतीच्या 15 व्या मजल्यावर मोठऊ आग

मुंबई | घाटकोपर परिसरातील आर सिटी मॉलजवळील 28 मजली इमारतीच्या 15 व्या मजल्यावरील खोलीत आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही: BMC

पुण्यातील तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन मागे

कुस्तीपटू आपले मेडल गंगेत विसर्जीत करण्यासाठी पोहचले

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीवर पैलवान आंदोलक ठाम आहेत. आता आंदोलक पैलवान हे त्यांनी कमावलेलं मेडल गंगेमध्ये विसर्जित करण्यासाठी पोहचले आहेत.

संचेती पुलावर शोले स्टाईल आंदोलन!

जुन्नर तहसिलदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी युवकाने संचेती पुलावर शोले स्टाईल आंदोलन सुरु केले आहे

कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचा 'ब्रेक थ्रू'

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचे खनन काम पूर्ण झाले. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे.

केंद्रीय समितीने केले महाराष्ट्रातील औद्योगिक कॉरिडॉर विकास कामांचे कौतुक

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉरच्या विकास आणि अंमलबजावणीबाबत शिखर संनियंत्रण समितीची बैठक आज दिल्लीत संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल या बैठकीस उपस्थित होते.

राज्यातील शेंद्रा-बिडकीन (औरंगाबाद) आणि दिघी (रायगड) औद्योगिक कॉरिडॉरचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. केंद्र सरकारने देशभरात विविध औद्योगिक टाऊनशिपमध्ये उद्योग समूहासाठी २३९ प्लॉट वितरित केले होते. त्यातील महाराष्ट्रात शेंद्रा-बिडकीन येथे २०० प्लॉटचे वितरण केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावर केंद्रीय समितीने महाराष्ट्रातील औद्योगिक कॉरिडॉर विकास कामांचे कौतुक केले.

पुण्यात कोथरूड परिसरात पावसाला सुरूवात...

पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे. काल शहरात रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. दरम्यान आज (मंगळवार) शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला आहे.

नाशिक महापालिका अतिक्रमण पथकावर दगडफेक

नाशिक महापालिका अतिक्रमण पथकावर संतप्त नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू असताना हा सगळा प्रकार घडला आहे. त्यानंतर पोलिसांकडून या नागरिकांची धरपकड करण्यात आली असून या प्रकारानंतर दंगल नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई आली आहे.

भाजप नेते राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 

भाजप नेते राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जीवे मारण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नितीश कुमार यांनी बोलावली देशातील विरोधकांची बैठक

नितीश कुमार यांनी देशातील विरोधकांची बैठक बोलावलीआहे. 12 जून रोजी पाटणा येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत.

आंदोलक पैलवान मिळालेले त्यांचे मेडल गंगेत विसर्जित करणार

आंदोलक पैलवान मिळालेले त्यांचे मेडल गंगेत विसर्जित करणार आहेत. त्याचबरोबर ते इंडिया गेट येथे उपोषण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे कणकवलीतील नेते संदेश पारकर मंत्री रविंद्र चव्हाणांच्या भेटीला

ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी आज मुंबई-गोवा हायवेवर येत भाजप नेते पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट घेतली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेत्री गार्गी फुलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अभिनेत्री गार्गी फुलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या प्रसिद्ध अभिनेते निळु फुले यांच्या कन्या आहेत.

स्माईल अम्बॅसिडर म्हणुन सचिन तेंडुलकरची नियुक्ती

स्माईल अम्बॅसिडर म्हणुन सचिन तेंडुलकरची नियुक्ती झाली आहे. नियुक्ती करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

साताऱ्याजवळ फर्नीचरच्या गोदामास भीषण आग

सातारा शहराजवळ रामनगर परिसरात आज सकाळच्या सुमारास एका फर्नीचरच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच सातारा पालिकेचे फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीसांचा लाठीचार्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत.सध्या जयसिंगपुरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 10 भाविकांचा मृत्यू

वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांची बस दरीत कोसळली, यामध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटली येथे बस घसरून खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर