
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
अरबी समुद्रात जाऊ नका, हवामान खात्याच्या मच्छिमारांना सूचना
मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये अशा सूचनान हमामान खात्याने दिल्या आहेत. पुढील २४ तासात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून समुद्र खवळलेला असेल असे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचं ठरलं! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार
शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. अमोल कोल्हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी दिली. शरद पवारांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांशी-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी एकूण या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांना मी मागील चार वर्षांच्या काळातील कामकाजाबद्दल माहिती दिली, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुलोचना दीदींच्या पार्थिवाच दर्शन घेण्यासाठी दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुलोचना दीदींच्या पार्थिवाच दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी 5.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
अमित शाह यांच्यासोबत राज्यातील महत्वाच्या गोष्टींवर सकारात्मक चर्चा; CM शिंदेंची माहिती
अमित शाह यांच्यासोबत राज्यातील महत्वाच्या गोष्टींवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहीती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या बैठकीत कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण यावर चर्चा झाल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.
नाशिक मनपा शिक्षणाधिकारी लाच प्रकरणी झाडाझडती सुरू
नाशिक मनपा शिक्षणाधिकारी लाच प्रकरणी झाडाझडती सुरू केली आहे. सुनिता धनगर यांच्याकडे किती संपत्ती आहे याची चौकशी सुरू आहे.
पुण्यात राष्ट्रवादीची आढावा बैठक सुरू
पुण्यात राष्ट्रवादीची आढावा बैठक सुरू आहे.
"हे अपघाताचं इव्हेंट करणारं सरकार, घटनास्थळी मोदी मोदी नावाच्या घोषणा"
ओडीसा येथे झालेला अपघात खुप भीषण आहे. या अपघाताची जबाबदारी कोणाची आहे. हे सरकार या घटनेची जबाबदारी का घेत नाहीत. हे अपघाताचं इव्हेंट करणारं सरकार आहे. घटनास्थळी मोदी मोदी नावाच्या घोषणा दिल्या असंही ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी वाहिली सुलोचना दीदींना आदरांजली
आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी (४ जून) रोजी या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील सुलोचना दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून "सुलोचनादीदी गेल्या, मराठी आणि हिंदी रूपेरी पडद्यावरील मांगल्य हरपले. आज संपूर्ण सिनेसृष्टीची 'आई' कायमची पडद्याआड गेली", असं म्हटलं आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता! शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली भेटीत चर्चा झाल्याची माहिती
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखावर तारखा समोर येत असतानाच आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (4 जून) दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर