दिवसभरात देश-राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

दिवसभरात देश-राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीकवर

'हिमाचलमध्ये भाजप सरकार आल्यास समान नागरी कायदा लागू केला जाईल'-अमित शाह

हिमाचलमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासही भाजप जोरदार प्रचार करत आहे. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घोषणा केली आहे. पुन्हा जय राम ठाकूर यांचे सरकार येणार असून येथे समान नागरी संहिता लागू केली जाईल.

ठाण्यातील दिवा डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग

ठाणे जिल्ह्यातील दिवा डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या महाराष्ट्रात प्रवेश करणार

संध्याकाळी साडेसात वाजता ही यात्रा लातूर जिल्ह्यातल्या देगलूर येथे पोहोचेल. त्यानंतर मशाल यात्रा निघणार आहे आणि नांदेड येथे मुक्काम.

 ऋतुजा लटके यांचे रश्मी ठाकरे यांनी स्वत: औक्षण केले. यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. प्रत्येक शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद पाहायला मिळत होता. 

शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत

टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर मोठा विजय

टीम इंडियाने आज सुपर 12 राऊंडमधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेवर विजय मिळवला. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय मिळवला.

असे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी- छत्रपती संभाजीराजे

हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाचा मोडतोड आणि विपर्यास.

महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो.

एतिहासिक चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत पण, चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला जातोय. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का.

तर "वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटावर त्यांनी प्रचंट नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले "काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का"

लटकेंच्या विजया नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली 

मशाल भडकली भगवा फटकला

पराभावाचा अंदाज आल्यामुळं भाजपने माघार घेतली.

चिन्ह कोणतही असो जनता आमच्या सोबत आहे.

विजयी झाल्यानंतर ऋतुजा लटके मातोश्रीवर दाखल 

अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर ऋतुजा लटके पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेल्या आहेत.

शिवसेना भवनाजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष

ऋतुजा लटकेंचा अंधेरी पोटनिवडणुकीत विजय मिळवला असून त्यांना 66,247 मतांनी मिळाली आहेत.

मशाल पेटली; अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय

ऋतुजा लटकेंचा अंधेरी पोटनिवडणुकीत विजय मिळवला असून शिवसेना भवनाजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके 58875 इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत.तर नोटाला 11569 इतकी मत मिळाली आहेत. 

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी चौदावी फेरी निकाल -

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

चौदावी फेरी. (14)

ऋतुजा लटके - 52507

बाळा नडार - 1240

मनोज नाईक - 748

मीना खेडेकर - 1190

फरहान सय्यद - 897

मिलिंद कांबळे - 519

राजेश त्रिपाठी - 1291

नोटा - 10284

एकूण - 68676

उत्सुकता शिगेला; ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

आतापर्यंत ऋतुजा लटके यांना सर्वाधिक मते मिळाली असून अखेर विजय त्यांचाच असल्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवत तोंड गोड करायला सुरवात केली आहे.

आलिया आणि रणबीरला कन्यारत्न; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं. आलियानं सर एच एन रिलायन्स रुग्णालयात बाळाला जन्म दिला. आलियाला आज सकाळी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं.

बारावी फेरी पूर्ण; ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर 

मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी आता 12 फेऱ्या पूर्ण झाल्या असून ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठयावर आहेत. त्यांना आता या फेरीत 45218 मते मिळाली आहेत. तर नोटाला 8878 मतदान मिळाले आहेत.

 अंधेरी निवडणूकीत नोटाला जास्त मते हा सगळा भाजपचा डाव

अंधेरी निवडणूकीत नोटाला जास्त मते हा सगळा भाजपचा डाव असल्याचं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. भाजपने लोकांना फुस द्यायचा प्रयत्न केला. उध्दव ठाकरे जे म्हणाले ते सत्य होत आहे मशाली वर पहिला आमदार निवडून येत आहे. यांच्या सगळ्या कामाला मतदाराने चांगल उत्तर दिलं आहे. तर भाजपने कलंकित उमेदवार दिला होता. निवडणूक बिनविरोध केली जात असते पण तस झाल नाही. ऋतुजा लटके यांचं अभिनंदन त्यांना ६० हजारच्या पुढे मते मिळतील असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्यात

नवव्या फेरीअंती ऋतुजा लटके आघाडीवर 

आता उत्सुकता शिगेला पोहचली असून अंधेरी पोटनिवडणुकीत नवव्या फेरीअंती ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी 9 फेऱ्यामध्ये 32 हजार 515 मते मिळाली आहेत तर नोटाला 6 हजार 637 मते मिळाली आहेत.

लोकशाहीमध्ये आरोप एकमेकांवर आरोप करण्यावर बंधन आणता येत नाही- चंद्रकांत पाटील

अंधेरीमध्ये लोकांची मानसिकता काही आहे कळत नाही,त्यामुळे लोकांचं मी नाही सांगू शकत,त्यामुळे नोटा का मंतदान झालं नाही कळत असं चंद्रकांत पाटील म्हणलेत. पुण्यात नियोजन बैठकमध्ये विरोधी आमदारांना कमी निधी देऊन तोंडाला पाणी पुसले होते त्यामुळे मी अजित पवार,दिलीप वळसे पाटील,मामा भरणे,आणि काही सुनील शेळके यांचे निधी कमी केले असं चंद्रकांत पाटील म्हणलेत. त्याचेही अंदाजपत्रक सेव्ह करायला सांगितले आहे,त्यामुळे माझ्या आमदारांना निधी जास्त देणार आहे,कारण आता सत्ता आली तर निधी द्यावा लागेल. मातोश्री किंवा वर्षा मध्ये जाऊन कोणी सभा घेऊ शकत नाही त्यामुळे अंगणात घ्यायला काय हरकत नाही. गेले अडीच वर्षे आम्ही संघर्ष केला सरकारला झोपू दिलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादी यांचा डीएनएच नाही संघर्षचा विरोधी म्हणून आम्ही केलं आणि करतो पण करून दाखवतो. पक्ष म्हणून १०० करणं गैर नाही,पण आम्ही वलग्ना करत नाही,७० च्या जात नाही आणि वल्गना करत आहेत. जयंत पाटील यांनी म्हणत राहावं सरकार पडेल आणि ताकद असेल तर करून दाखवावा असा टोलाही पाटलांनी लगावला आहे.

मतमोजणीत ६ व्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते

महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत ६ व्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे :

१) श्रीमती ऋतुजा लटके- २१०९०

२) श्री.बाला नाडार - ६७४

३) श्री.मनोज नायक - ३९८

४) श्रीमती नीना खेडेकर- ५८७

५) श्रीमती फरहाना सय्यद- ४४८

६) श्री.मिलिंद कांबळे- २९१

७) श्री.राजेश त्रिपाठी- ६२१

आणि

नोटा -४३३८

एकूण मते : २८४४७

ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित 

अंधेरी पोटनिवडनुकीत चौथ्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना 14648 मत मिळाली आहेत. पाचव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 17278 मत मिळाली आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना सहाव्या फेरीत 21090 मते मिळाली आहेत. तर नोटाला 4338 मते मिळाली आहेत. ऋतुजा लटके यांच्यानंतर नोटाला सर्वात जास्त मते मिळाली आहेत.

दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर

अंधेरी पोटनिवडणुकीत दुसऱ्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना 12,094 मत मिळाली आहेत. ठाकरे गटाच्या लटके यांच्यानंतर मतदारांची दुसरी पसंती नोटा ला

आदित्य ठाकरे 9 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता

आदित्य ठाकरे दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर असतील. त्यानंतर ते राहुल गांधी यांच्यासोबत नांदेड मध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे 7 नोव्हेंबरला अकोला, बुलढाणा, संभाजीनगर दौऱ्यावर असतील तर ८ नोव्हेंबरला जालना, बीड, धाराशिवमध्ये दौऱ्यावर असतील. काँग्रेसचं शिष्टमंडळ ठाकरेंना मातोश्रीवर भेटलं होत तेव्हा त्यांनी सहभागी होण्याची तयारी देखील दर्शवली होती

अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

अंधेरी पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतदारांचा कौल कुणाला? मिळणार या गोष्टींमुळे धाकधूक वाढली आहे. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. एकाचवेळी 14 टेबलवर मतमोजणी होणार असून एका टेबलवर प्रत्येकी 1 हजार मतांची मोजणी होणार आहे. तर मतमोजणीच्या एकूण 5 फेऱ्या होणार असून एकूण 70 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

मुंबईतील किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली ट्रकचा मोठा अपघात, वाहतूक मंदावली

मुंबईतील सायन किंग्ज सर्कलच्या पुलाला धडकून आज सकाळी एका ट्रकचा मोठा अपघात झाला. यामुळे किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक अडकल्याने वाहतूक मंदावली. यासंदर्भातील माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली.

अंधेरी पोटनिवडणुकीतील टपाली मतमोजणीला सुरूवात

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालासाठी काही तासच शिल्लक राहिलेत. टपाली मतमोजणीला सुरूवात झाली आहे

गुलाल कोणाचा? अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान झालं होतं. याची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर