Marathi News Update: देशात-महाराष्ट्रात आज दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Live Update
Marathi News Live Update

अपघातानंतर कोरोमंडल एक्सप्रेस बालासोर रेल्वे स्थानकावर पोहोचली

ओडिशाच्या बालासोरमध्ये तिहेरी टक्कर झालेल्या ट्रेनपैकी एक कोरोमंडल एक्सप्रेस बालासोर रेल्वे स्थानकावर पोहोचली.

पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर प्रकरणी अधिकाऱ्यांची बैठक घेणार

कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर शहरातील डीएम कार्यालयात एसपी, डीएम आणि पोलीस आणि प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर... अजित पवार संतापले

मुंबई कधीही झोपत नाही, अशा ठिकाणी एका निष्पाप मुलीवर अन्याय केला जातोय, राज्य सरकारची मान शरमेने खाली घालणारी ही बाब आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महिला वसतिगृहात झालेल्या मुलीच्या बलात्कार व हत्येप्रकरणी प्रतिक्रिया नोंदवली. अशा घटना सातत्याने वाढत असताना सरकार त्यावर कठोर भूमिका का घेत नाही? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पहाटे अशा घटना घडत असतील तर यातून राज्यात कुठेही महिला, मुली सुरक्षित दिसत नाहीत. या सर्व घटनेला पोलिस प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप अजित पवारी यांनी केला. राज्य सरकार यामध्ये कठोर भूमिका घेताना दिसत नाही. या घटनेतील नराधमाला सुरक्षारक्षक म्हणून कोणी घेतले याची माहिती समोर येण्यासाठी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार अशाप्रकारे निष्काळजीपणा दाखवणार असेल तर त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. राज्य सरकारने राज्यभरातील महिला वसतिगृहांमधील सुरक्षायंत्रणा व्यवस्थित आहे का, याचा तपास करावा. तसेच या गैरकृत्याचा छडा लावावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

औरंगजेबाच्या इतक्या औलादी कुठून जन्माला आल्या - देवेंद्र फडणवीस

औरंगजेबाच्या औलादी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जन्माला आल्या आहेत. ते औरंगजेबाचा फोटो दाखवतात, ठेवतात आणि पोस्ट करतात. त्यामुळे समाजात द्वेष आणि तेढ निर्माण होत आहे. अचानक औरंगजेबाच्या इतक्या औलादी कुठून जन्माला आली, हा प्रश्न आहे. त्याचा खरा मालक कोण आहे हे आपण शोधून काढू. परिस्थिती नियंत्रणात आहे. लोकांना कायदा हातात घेऊ नका असे आवाहन केले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते नागपुरात बोलत होते.

शासकीय वसतीगृहात मुली सुरक्षित नाहीत? अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

शासकीय वसतीगृहात मुली सुरक्षित नाहीत? असा घणाघात अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशा घटना थांबातला तयार नाहीत. याआधी सुरक्षा रक्षकांवर गुन्हे दाखल होते का? हेही पाहणं महत्वाचं आहे. राज्यात मुली, महिला सुरक्षित नाहीत या बाबतीत सरकार निष्काळजी आहे असा घणाघात अजित पवारांनी केला आहे.

कोल्हापुरात आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर इंटरनेट सेवा बंद

कोल्हापुरात आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात अफवांचं पेव फुटू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

  कोल्हापुरात थोड्याच वेळात होणार इंटरनेट बंद?

कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान थोड्याच वेळात कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. यांसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे कोल्हापूरच्या आयजींनी सांगितले.

औरंगजेब आपले दैवत कधीच होऊ शकत नाहीत आपलं दैवत एकच ते म्हणजे 'शिवराय' - धनंजय महाडीक

औरंगजेब आपले दैवत कधीच होऊ शकत नाहीत आपलं दैवत फक्त एकच आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याचे काम करणाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. अशा घटना घडू नयेत. पोलिस परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे धनंजय महाडीक यांनी म्हंटलं आहे.

कोल्हापुरात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या 6 जणांना अटक

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत दोषी असणाऱ्या आणि काल दगडफेक करणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती केसरकर यांनी सांगितलं आहे

औरंगजेबाची आठवण काढणारे आणि त्यावर प्रेम करणाऱ्याला महाराष्ट्रात ठेवणार नाही - नितीश राणे

शिवरायांनी ज्या औरंगजेबासोबत संघर्ष केला, त्या औरंगजेबाची एकही आठवण किंवा त्यावर प्रेम करत असेल तर त्याला आम्ही महाराष्ट्रात ठेवणार नाही. पोलिस त्यांचं काम करतील तर हिंदुत्ववादी संघटना काशी तुमची मस्ती उतरवतील ही तुम्हाला लवकरच कळेल असं भाजप नेते नितीश राणे यांनी म्हंटलं आहे.

परिस्थिति नियंत्रणात आणण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश

कोल्हपुरमधील परिस्थिती चिघळत चालली आहे. पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. अशातच परिस्थिति नियंत्रणात आणण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं! संजय राऊत यांनी भाजपला कुरुलकरांवरून केलं लक्ष

राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केलं आहे. राऊत यांनी डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा विषय काढून भाजपवर टिका केली आहे. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहात. कुरुलकरने पाकिस्तानला भारताची गुपित विकली. हा प्रकारही औरंगजेबा इतकाच गंभीर आहे. त्यावरही आंदोलने करायला हवी होती, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

राज्यातील दंगली किंवा जातीतील तेढ निर्माण होण्यामागे राज्यातील सत्ताधारी जबाबदार - शरद पवार

राज्यातील दंगली किंवा जातीतील तेढ निर्माण होण्यामागे राज्यातील सत्ताधारी जबाबदार आहेत, असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण कोण करतंय, खोलात जावेच लागेल : देवेंद्र फडवणीस

एका विशिष्ट समाजातील लोक औरंगजेब व टिपू सुलतान यांचे उद्दातीकरण करत आहे. पण यामागे कोण आहे. याचा शोध घ्यावा लागेल. विशेष म्हणजे काही नेते बोलतात. त्यानंतरच विविध जिल्ह्यांमध्ये उद्दातीकरण केले जाते. यामागे नेमके कोण आहे, याच्या खोलात जावेच लागेल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पोलिसांकडून आंदोलन मागे घेण्याचं आवाहन 

पोलिसांकडून आंदोलन मागे घेण्याचं आवाहन कोल्हापुरातील आंदोलकांना केलं आहे. कोल्हापूरात चौकाचौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने सर्व हिंदुत्ववादी संघटनांना बंद मागे घेण्याचे आवाहन केलं होतं. स्टेटस ठेवणारे तसेच बेकायदेशीर जमाव जमवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे. 

कोल्हापुरातील मटण मार्केट परिसरात पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू

कोल्हापुरातील मटण मार्केट परिसरात पोलिसांचा लाठीचार्ज सुरू केला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापर सुरू केला आहे.

दिल्लीतील अमित शहांच्या घरासमोर मणिपुरच्या कुकी समाजाचे आंदोलन

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी कुकी समाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराबाहेर निदर्शनाला सुरुवात केली आहे. अमित शहा म्हणाले होते की, लवकरच शांतता प्रस्थापित होईल, परंतु आजही राज्य बल कुकी समुदायावर हिंसाचार करत आहे.

वर्ध्यातील सेवाग्राम एमआयडीसी परिसरात भंगार आग

वर्ध्यातील सेवाग्राम एमआयडीसी परिसरात भंगार डेपोला भीषण आग लागली आहे. आगीवर नियत्रंण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भंगार डेपोतील मोठं सामान जळुन खाक झालं आहे.

कोस्टल रोड मेट्रोने, नवी मुंबई विमानतळाला जोडणार- उपमुख्यमंत्री

कोस्टल रोड मेट्रोने, नवी मुंबई विमानतळाला जोडणार असल्याची माहीती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केली. पाहणीनंतर त्यांनी पत्रकार परीषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यानी याबाबतची माहीती दिली आहे. मुंबईचा विमानतळीवरील भार कमी होईल. २०२४ पर्यंत हे विमानतळ सुरू होईल असंही शिंदे म्हणालेत.

कोल्हापुरात आज बंदची हाक! आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्यामुळे शहरात उमटले संतप्त पडसाद

काल शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या वादग्रस्त प्रकारानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमणार आहेत. आज कोल्हपुरमध्ये शुकशुकाट दिसुन येत आहे.

कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालं असं नाही - शरद पवार

कुस्तीपटूच्या आंदोनावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या समर्थनात अप्रत्यक्षपण बाजू मांडली आहे. यावेळी त्यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालं अस काही नाही असं म्हटलं आहे

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com