
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
नालंदा जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत इंटरनेट सेवा बंद
बिहारच्या नालंदा जिल्ह्यामध्ये बंद केलेल्या इंटरनेट सेवेचा कालावधी ४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. रामनवमी उत्सवादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने नालंदा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे.
शिवरायांचं नाव घेता आणि पाठिमागून वार करता?- उद्धव ठाकरे
सामान्यांचे मुख्यमंत्री सांगता अन् मराठवाड्यातील जनतेचा अपमान करता?
छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना शिंदे-फडणवीस सरकारनं का थांबवलं नाही.
महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार.
अजित पवार यांनी सरकारचे काढले वाभाडे
अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या महत्त्वाच्या सुचना दिल्या पुढील काळात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी काम करा, सुप्रिम कोर्टाकडे सगळ्याचे लक्ष लागून आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे.
अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या महत्त्वाच्या सुचना
अजित पवार यांच्या भाषणाला सुरूवात
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल
कितीही गौरव यात्रा काढल्या तरी फरक पडणार नाही- अशोक चव्हाण
महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली- थोरात
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन शेतीसाठी अनेक योजनांना पाठबळ दिलं. परंतु सध्या परिस्थिती बिघडली आहे. नुसत्या घोषणांचा पाऊस सुरु आहे, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर केली
आमची वज्रमूठ बघून सरकारच्या पायाखालची वाळू सरकली- मुंडे
आम्ही नुसती वज्रमूठ आवळली तरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. इथून पुढे महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणुका लढणार आहे. जनता या सरकारला वैतागली असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
वज्रमूठ सभेला घाबरुन यात्रा काढली- धनंजय मुंडे
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला घाबरुन सरकारमधल्या पक्षांनी एक यात्रा सुरु केलीय. जिथे वज्रमूठ सभा होईल तिथे त्यांची यात्रा येणारच आहे.
औरंगाबादचं नामकरण 'मविआ'नेच केलं- धनंजय मुंडे
देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला भाजपने एप्रिल फूल बनवलं आहे. मागील १० वर्षे जनतेची भाजपकडून चेष्टा सुरुय. त्यामुळे त्यांचा वर्धापनदिन १ एप्रिलला जनता साजरा करेल. खऱ्या अर्थाने औरंगाबादचं नामकरण महाविकास आघाडीच्या सरकारनेच केल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नऊ तारखेला अयोध्याला जाणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नऊ तारखेला अयोध्याला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. राज्यातील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार या सगळ्याना घेवून त् जाणार आहेत.
मविआच्या वज्रमुठ सभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पोहचले
मविआच्या वज्रमुठ सभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे पोहचले आहेत. थोड्याच वेळात सुरू होणार.
मविआच्या वज्रमुठ सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जाणार नाहीत
मविआच्या वज्रमुठ सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जाणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. नाना पटोले यांची प्रकृती ठिक नसल्याने जाणार नसल्याचे समजत आहे.
थोड्याच वेळात मविआची वज्रमुठ सभा
छत्रपती संभाजीनगरात आज होणारी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
उत्तराखंडमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
मसुरी-डेहराडून मार्गावर रोडवेज बसचे नियंत्रण सुटल्याने अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका.
'सावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान...'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी घेणार कर्नाटकात 20 सभा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आलाय, त्यामुळं स्टार प्रचारक म्हणून पक्षाच्या राज्य युनिटनं पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) किमान 20 रॅलींचं नियोजन केलंय. कर्नाटकात 10 मे रोजी राज्यातील सर्व 224 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 8 मे दरम्यान राज्यात तळ ठोकू शकतात. या दरम्यान ते काँग्रेस (Congress) आणि जेडीएसच्या (JDS) बालेकिल्ल्यात प्रचार करू शकतात.
सुरत कोर्टाच्या निर्णयाला राहुल गांधी आव्हान देणार
मानहानीच्या खटल्यामध्ये दोषी ठरवत सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व आणि सरकारी बंगलाही गमवावा लागला. आता राहुल गांधी सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत. सोमवारी ते याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिले आहे.
समलिंगी विवाह हा कुटुंब व्यवस्थेवर हल्ला : जमियत उलेमा-ए-हिंद
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी जमियत उलेमा-ए-हिंद ही मुस्लिम संघटना रस्त्यावर उतरलीये. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना विरोध करत जमियत उलेमा-ए-हिंदनं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदनं हा कुटुंब व्यवस्थेवर हल्ला असल्याचं म्हटलंय. 'हे सर्व वैयक्तिक कायद्यांचं पूर्णपणे उल्लंघन आहे.' सुप्रीम कोर्टात प्रलंबित याचिकांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करताना जमियत उलेमा-ए-हिंदनं हिंदू परंपरांचा हवाला दिला आहे.
आजची मविआची सभा ऐतिहासिक होईल; राऊतांनी व्यक्त केला विश्वास
सावरकरांचे विचार आम्ही पूर्णत: आत्मसात केले आहेत. मिंधे गटानं सावरकरांचे साहित्य वाचावे, समजूव घ्यावे. त्यांच्या विचारांच पारायण करावे. सावरकरांचे हिंदुत्वाचं विचार भाजपाला मान्य आहेत का? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी सावरकर गौरव यात्रेवर टीकास्त्र सोडले. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची व्रजमूठ सभा होत आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलत असताना, या सभेची जोरदार तयारी झाली आहे. सभा शांततेत पार पडली जाईल. आजची सभा ऐतिहासिक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतात 18 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण; 24 तासांत 3,824 नवे रुग्ण आढळले
भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहेत. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 18 हजारांहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मागील दिवसांच्या तुलनेत रविवारी (2 एप्रिल) भारतात कोविड-19 ची 28 टक्के प्रकरणं वाढली आहेत. गेल्या 24 तासांत 3,800 हून अधिक नवीन कोविड-19 प्रकरणं आढळली आहेत.
रामकृष्ण मिशनचे उपाध्यक्ष स्वामी प्रभानंद यांचं निधन
रामकृष्ण मठ आणि मिशनचे उपाध्यक्ष स्वामी प्रभानंद यांचं शनिवारी संध्याकाळी कोलकाता (Kolkata) येथील रुग्णालयात निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते.
जयंत पाटलांनी घेतली खासदार बापटांच्या कुटुंबीयांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केलं.
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
Weather Update : दिल्ली-यूपीसह देशातील अनेक राज्यांत हवामान विभागानं (Meteorology Department) अलर्ट जारी केलाय. तर, दुसरीकडं अनेक ठिकाणी वादळ आणि गारपिटीमुळं शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं (IMD) दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तर पश्चिम भारतातील इतर अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय. या राज्यांमध्ये 3 ते 4 एप्रिल दरम्यान वादळ आणि गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज (रविवार) अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये हलका पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
माजी क्रिकेटपटू सलीम दुराणी यांचं निधन
टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुजरातच्या जामनगर येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते कर्करोगाने ग्रस्त होते. दुराणी यांच्या निधनामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.
मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
आज मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज (रविवार, 1 एप्रिल) मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी मार्गावर आज मेगाब्लॉक असेल. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी तिन्ही मार्गांवरील अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी मंत्री नारायण राणेंची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अलिबाग न्यायालयानं निर्दोष मुक्तता केलीये. न्यायालयानं या प्रकरणी दाखल केलेलं जामीनपत्रही रद्द केलंय.
समृद्धी महामार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारनं मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडे बारा वाजता दरम्यान घडला.
अमेरिकेला चक्रीवादळाचा तडाखा; 21 जणांचा मृत्यू
या विनाशकारी वादळानं अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात (America Tornado) पुन्हा कहर केलाय. देशातील विविध भागात भीषण वादळ आणि चक्रीवादळामुळं 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर डझनभर लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. तसंच, पीडितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
सांगलीत वनविभागाच्या गोदामाला भीषण आग
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणावतीमध्ये वन्यजीव कार्यालयाच्या शेजारी असलेल्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये वनविभागाच्या ताब्यातील लाखो रुपयांच्या नरक्या (औषधी वनस्पती) आगीत जळून खाक झाल्या आहेत. या आगीत वीस वर्षांपूर्वी जप्त केलेला मुद्देमाल जळाला आहे.
छत्रपती संभाजीनगरात आज मविआची जाहीर सभा, सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार
आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे.