दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावात जाहीर सभा आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

एमपीएससी हॉलतिकीट प्रकरणात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तर ते देखील सांगतील पण आमच्याकडील मोतीबींदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखले नाही.

  • यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांना देखील टोला लगवाला आहे. सभेत घुसणार? म्हणतात. अशा घुशी आम्हीं खुप पाहिल्या आहेत. घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

  • आज खरच तात्यांची उणीव भासते. एक कणखर, खंदा, जिद्दी, मेहनती आणि अत्यंत विश्वासू सहकारी जाणे हे फार मोठ नुकसान. चाळीस गद्दार हरामखोर गेले तरी फरक पडत नाही परंतु एक विश्वासू माणूस जातो तेंव्हा फार मोठा खड्डा पडतो. अभिमान आहे की शेतकर्‍याने मेहनत केल्यावर त्याच आयुष्य, त्याच कुटुंब समृद्ध कस व्हावं याकरिता झटणारे हे घराणे आहे.

  • त्यांना जस घोड्यावर चढवलं होत तस पुन्हा खाली खेचण्याची वेळ आता आली आहे. निवडुन आलेले गद्दार झाले परंतु निवडुन देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी तुमच्या निष्ठेला डाग लावला, कलंक लावला, ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला, तो कलंक तर धुवायचा आहेच पण ते कलंक लावणारे हात देखील आपल्याला राजकारणात कायमचे गाडून टाकायचे आहेत.

  • आपले सरकार होत तेव्हा कोरोनाच संकट होत ते काही सरकारनिर्मित संकट नव्हतं. नैसर्गिक चक्रीवादळ देखील येत होती. पण प्रत्येक सभेत विचारतो, तोच प्रश्न विचारतोय, ज्या-ज्या वेळेस संकट येत होती त्या त्या वेळेस सरकारची मदत मिळत होती का नव्हती?. हे उलट्या पायाच सरकार हे स्वत:च एक संकट आहे.अवकाळी आलेलं सरकार आहे. गारपीट काय होतेय, अवकाळी पाऊस काय पडतोय. एका तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहचली का? शेतकर्‍यांना पीक वीम्याचे पैसे मिळाले असतिल तर सांगा. हे बोलायच नाही, तर काय करायचं?

  • खर बोललं तर त्याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. पोलीसांना देखील सांगायचय, तुम्ही देखील शेतकर्‍याची मुल आहात. शेतकर्‍याने त्यांच्या व्यथा शब्दांकन करुन टाहो फोडला तर त्याला तुम्ही अटक करणार?

अजितदादांमुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे- अंधारे

जळगावातील सभेमध्ये बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिंदे गटाचं हिंदुत्व बेगडी हिंदुत्व आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. या अस्वस्थेमुळे काही लोक वाटेत ते बोलू लागले. त्यांची विधाने हिंदुत्वाचं बेगडीपण दाखव होती. त्यातच गुजरातमधील वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीने अस्वस्थता आणखी वाढवली होती.

जळगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला सुरुवात

जळगाव येथील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावमध्ये आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे.

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला

यंदाचे साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्थळनिश्चिती झालेली आहे.

कॅबिनेटमध्ये गुंड भरलेत का? संजय राऊतांचा सणसणीत सवाल

मुख्यमंत्री कॅबिनेट चालवतात की गुंडाची टोळी? राज्याच्या कॅबिनेटमध्ये गुंड भरलेत का? मंत्र्यांनी गुंडांची भाषा करु नये, त्यांनी सांगावं ते मंत्री आहे की गुंड? असा सणसणीत सवाल संजय राऊतांनी केला आहे.

अमोल कोल्हे यांच्या ट्विटमुळे पुन्हा भाजप प्रवेशाच्या चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज पुस्तक दिनानिमित्त एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी दोन पुस्तकं वाचतानाचे फोटो शेअर केले आहेत. एक पुस्तक शरद पवारांचं 'नेमकचि बोलणे' आणि दुसरं 'द न्यू बीजीपी' हे पुस्तकं ते वाचत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जळगावात आगमन

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जळगावात आगमन झालं असून पाचोऱ्यात आज जाहीर सभा होणार आहे.

अजित पवार आता मुख्यमंत्री होणं शक्य नाही - भरत गोगावले

अजित पवार म्हणत आहेत की, आता जर मुख्यमंत्री झालो तर बरं होईल. पण, आता तसं शक्य नाही. कारण जे आमचं ठरलं आहे ते ठरलं. त्याच्यात आता बदल नाही, असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले आहेत.

MPSC हॉल तिकीट लिक प्रकरण : पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असतानाच या परीक्षेचं प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलंय. त्यामुळं आता आयोगानं सायबर पोलिसांत तक्रार केली आहेत. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय. अनेक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाले असून MPSC आयोगानं दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून तपास होणार आहे.

विश्वासाला तडे जाऊ देणार नाही - अजित पवार

बारामती : 1967 पासून शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवला आहे. माझ्यावर त्यांनी 1990 पासून विश्वास टाकला आहे. या विश्वासाला तडे जाऊ देणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. एका हॉटेलच्या उद्घाटनाच्यानिमित्तानं अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय.

जळगावच्या सभेसाठी ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी पाणपोईची व्यवस्था

खारघर प्रकरणानंतर खबरदारी म्हणून ठाकरे गटाकडून सभेसाठी येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. आज जळगावच्या पाचोऱ्यात ठाकरे गटाची भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र दुपारपासूनच कार्यकर्त्यांची येण्याची शक्यता लक्षात घेता, ठाकरे गटाकडून सभेपासून 2 किलोमीटर परिसरात पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. खारघर प्रकरणानंतर खबरदारी म्हणून ठाकरे गटाकडून सभेसाठी येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

गुलाबराव पाटलांना शोधणाऱ्यास 51 रुपयांचं बक्षीस! गावागावात झळकले पोस्टर

बुलढाण्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील हरवले आहेत. अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच पाटील यांना शोधून देणाऱ्याला 51 रुपयांचं बक्षीस असा मजकूर या पोस्टरवर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्राला पुढील 4-5 दिवस 'यलो' अलर्ट

महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांना पुढचे चार ते पाच दिवस यलो अलर्ट (Weather Aleart) देण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अलर्ट देण्यात आला आहे. २४ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत या भागांत विजांच्या गडगडाटांसह, वादळी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

जितेंद्र आव्हाडांना मोक्का लावून तडीपार करा, तुषार भोसलेंची मागणी

जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस हा वारंवार आणि जाणीवपूर्वक हिंदू धर्माला टार्गेट करत असतात. तसेच जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करुन हिंदूंच्या सण उत्सवांना बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोक्का लावून त्यांना तडीपार करावं अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे. 

30 एप्रिलला होणार्‍या परीक्षेचा डाटा लीक; MPSC ची 'सायबर'कडे तक्रार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असतानाच या परीक्षेचे प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता आयोगाने सायबर पोलिसांत तक्रार केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब', 'क'च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक (Hall Ticket Hack) करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त विध्यार्थ्यांचे हॉल तिकिट हॅक झाले आहे. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपलोड करण्यात आले आहेत.

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
MPSC Combine Exam : ९० हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट Telegram वर लीक?

माझ्यासाठी राजारामची लढाई छोटी, आमचा विजय निश्चित आहे - महादेवराव महाडिक

छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. यावेळी बोलताना महादेवराव महाडिक म्हणाले की, "महाडिकांना निवडणूक नेहमीच सोपी असते. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. माझं कसं असतं धर की पकड आणि स्वारी घाल ते लगेच चिटपट कर. त्यामुळे माझ्यासाठी राजारामची लढाई छोटी आहे, आमचा विजय निश्चित आहे." 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

HD Kumaraswamy Hospitalised : जेडी (एस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची प्रकृती खालावली आहे. ते सध्या बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात (Manipal Hospital) दाखल आहेत. बंगळुरूमधील मणिपाल हॉस्पिटलनं एका निवेदनात म्हटलंय, 'एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांची प्रकृती सध्या ठीक आहे असून ते निरोगी आहेत.'

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
मोठी बातमी! ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती खालावली; जाणून घ्या कारण

राजकारणी खूप ठिकाणी डोळे मारतात; अमृता फडणवीसांचा अजित पवारांना टोला

राजकिय नेत्यांची एकमेकांची खूप जवळीक असते. त्यामुळे ते खूप ठिकाणी डोळे मारतात. पण मला माहिती नाही कि कोण कोण कुठे कुठे डोळा मारत आहे, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला. त्यांच्या या वक्तच्याची राजकिय वर्तुळात दिवसभर चर्चा रंगली होती.

24 तासांत देशात 10 हजार 112 कोरोना रूग्णांची नोंद

भारतात गेल्या २४ तासांत १० हजार ११२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आत्तापर्यंतची कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या ६७ हजार ८०६ पर्यंत पोहचली आहे. एकूण ९ हजार ८३३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

कर्नाटकात भाजप 125 ते 130 जागा जिंकेल - येडियुरप्पा

Karnataka Assembly Election 2023 : 224 सदस्यांच्या विधानसभेत भाजप 125-130 जागा जिंकून कर्नाटकमध्ये सत्तेत परत येईल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत केला. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांनी अलीकडंच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्यासाठी ही निवडणूक एक आव्हान असणार आहे. येडियुरप्पा म्हणाले, 'माजी मुख्यमंत्र्यांना हुबळी-धारवाड जागेवर कडवी झुंज द्यावी लागेल आणि यात त्यांचा पराभव होईल.'

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Karnataka Election : कर्नाटकात भाजप 125 ते 130 जागा जिंकणार; माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

येत्या 15 दिवसांत सरकार कोसळणार; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

जळगाव : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना डिवचलं आहे. गुलाबराव पाटील यांची गुलाबो गँग असल्याचं सांगतानाच आज पाटील यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. कोरोना काळात गुलाबराव पाटील यांनी कसा भ्रष्टाचार केला याची माहितीच राऊत यांनी दिली. तसेच गुलाबराव पाटील यांच्या पाणीखात्यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा दावा करतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? ते काय भ्रष्टाचाऱ्यांची टोळी चालवत आहेत काय? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे.

अंकिती बोस यांनी महेश मूर्तींविरोधात 820 कोटींचा मानहानीचा खटला केला दाखल

सिंगापूरस्थित फॅशन कंपनी झिलिंगोच्या सह-संस्थापक आणि माजी सीईओ अंकिती बोस यांनी सुप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि सीडफंड कंपनीचे सह-संस्थापक महेश मूर्ती यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Ankiti Bose: झिलिंगोच्या माजी CEO अंकिती बोस यांनी मूर्तीं विरोधात 820 कोटींचा मानहानीचा खटला केला दाखल

अतिकनं ताब्यात घेतलेली घरं, जमिनी पीडितांना परत करणार - CM योगी

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफिया अतिक अहमदनं ताब्यात घेतलेल्या जमिनी आणि घरं पीडितांना परत करण्यासाठी आयोग स्थापन करण्याबाबत बोललं आहे. आयोग स्थापन करून पीडितांची मालमत्ता त्यांना कायदेशीर मार्गानं परत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सीएम योगींच्या या निर्णयाचं प्रयागराजच्या झाल्वा येथील रहिवासी जयश्री उर्फ ​​सूरज कली यांनी स्वागत केलंय.

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Yogi Government : अतिकनं ताब्यात घेतलेली घरं, जमिनी पीडितांना परत करणार; CM योगींचा मोठा निर्णय

राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान सुरु

कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कारखान्यासाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी 10 केंद्रावर 580 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.  

आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच - राधाकृष्ण विखे पाटील

आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच असल्याचं भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. शिर्डीमध्ये राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित मिट द प्रेस या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय.

कोल्हापूर : राजाराम कारखान्यासाठी आज मतदान

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीसाठी धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

रत्नागिरी : नाणार रिफायनरी विरोधकांचे नेते सत्यजित चव्हाण यांना अटक

रिफायनरी विरोधकांचे नेते सत्यजित चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्या साथीला असलेले मंगेश चव्हाण यांना देखील अटक केल्याची माहिती आहे.

भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर

बुलढाण्यातील 'भेंडवळची घटमांडणी'चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे. घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे अंदाज आज वर्तवण्यात आले आहे. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन वर्षभराचं नियोजन आणि अंदाज वर्तवण्यात आले. तर राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. 

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगनं मोगा पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यानं मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. अमृतपाल तब्बल ३६ दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे.

उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यात सभा

 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. यापूर्वी खेड, मालेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा झाल्या आहेत. 

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 3 ठार तर 18 जण जखमी

Latest Marathi News : मध्यरात्री दोन वाजता पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 18 जखमी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावात जाहीर सभा आहे. तसेच राहुल गांधी आज कर्नाटकात बसव जयंती सोहळ्यात सहभागी होणार असून रोड शोही करणार आहेत. दुसरीकडं, गृहमंत्री अमित शहा हैदराबाद इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. शिवाय, खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यानं मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील 'भेंडवळची घटमांडणी'चं भाकीत आज जाहीर करण्यात आलंय. देशभरात काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे, तर काही भागांना उन्हाचा तडाखा बसत आहे. त्याचबरोबर देशात कोरोनानंही थैमान घालायला सुरुवात केली आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com