राज्यासह देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

सध्या महाराष्ट्रात सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय.
राज्यासह देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

गँगस्टर आतिक अहमदची पुन्हा साबरमती तुरुंगात रवानगी

गँगस्टर आणि राजकारणी आतिक अहमद याची पुन्हा गुजरातमधील साबरमती तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. उमेश पाल अपहरण प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

रामनवमीच्या पूर्वसंध्येला जय्यत तयारी

रामनवमीच्या पूर्वसंध्येला बिहारमध्ये जय्यत तयारी सुरु असून पटना शहरात २०,००० किलो लाडू तयार करताना हलवाई.

राष्ट्रवादीचे प्रतोद ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादीचे प्रतोद आणि आमदार अनिल पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार अनिल पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले.

गिरीश बापट यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत पोहचले

गिरीश बापट यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत पोहचले.

विद्युत दाहिनीमध्ये होणार अंत्यसंस्कार.

बापट साहेब अमर रहे, म्हणत खासदार गिरीश बापट यांच्या अंत्यात्रेला सुरुवात

शरद पवारांनी घेतले गिरीश बापट यांच्या पार्थिवाचे दर्शन

सतेज पाटील गटाला धक्का! छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 29 उमेदवारांचे अर्ज अवैद्य

काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांना मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पाटील गटातील 29 उमेदवारांना अपात्र ठरल्या धक्का बसला आहे. या उमेदवारांवर नियमानुसार कारखान्याला ऊस देत नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकारानंतर आमदार सतेज पाटील यांनी महाडिक गटाला जाहीर आव्हान दिले आहे. तर या निर्णया विरोधात सतेज पाटील हायकोर्टात जाणार आहेत.

गिरीष बापटांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे दाखल

गिरीष बापटांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे त्यांच्या निवास्थानी दाखल झाल्या आहेत.

खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं. दीड वर्ष ते रुग्णालयात दाखल होते. त्यांचा अंत्यविधी आज 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत होणार असल्याती माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. गिरीश बापट यांचं पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत त्यांच्या शनिवार पेठ इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे आणि सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बापट साहेबांचा दुखःद निधन अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहे. काही दिवसांपूर्वी दोनदा त्यांना भेटलो परंतू आजार देखील त्यांनी न घाबरता त्यांनी आजारीशी संघर्ष केला. गिरीश बापट हे ग्रासरूट पासून नगरसेवक, आमदार ते खासदार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सर्व जातीपातीच्या लोकांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सगळ्यांना हवाहवासा वाटणारा नेता आम्ही गमावला.

आजारी असताना देखील त्यांनी कसबा पोटनिवडणूकीमध्ये कर्तव्याला प्राधान्य दिलं प्राधान्य दिलं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंची गिरीश बापट यांनी वाहिली श्रद्धांजली

भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना असे ट्वीट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे गिरीश बापट यांचे अंत्यदर्शन पुण्यात येणार

दुपारी २.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश बापट यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येणार आहेत.

संजय राऊतांनी घेतली सोनिया, राहुल गांधींची भेट

श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची आज भेट झाली. अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यात पुन्हा भाजप पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करेल - प्रल्हाद जोशी

डीके शिवकुमार (कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष) हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत मोठे काँग्रेस नेते आहेत. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजप सज्ज असून राज्यात पुन्हा एकदा भाजप पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला.

खासदार गिरीश बापट यांचे निधन

खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं. दीड वर्ष ते रुग्णालयात दाखल होते. त्यांचा अंत्यविधी आज 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत होणार असल्याती माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. गिरीश बापट यांचं पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत त्यांच्या शनिवार पेठ इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे आणि सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राज्यासह देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Girish Bapat Passed Away : भाजपचा किंगमेकर हरपला! खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन

गिरीश बापट यांची भेट घेण्यासाठी धंगेकर दीनानाथ रुग्णालयात

गिरीश बापट यांची भेट घेण्यासाठी कसबाचे आमदार रविंद्र धंगेकर रुग्णालयात पोहचले आहेत.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान, 13 मे रोजी निकाल

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज (29 मार्च) कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 20 एप्रिलपासून नावनोंदणी सुरू होईल. 21 ते 23 एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रांचा आढावा घेतला जाणार आहे. 24 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. कर्नाटकात 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

80 वर्षांवरील लोक आणि दिव्यांग घरबसल्या मतदान करू शकतील- CEC राजीव कुमार

राजीव कुमार म्हणाले, निष्पक्ष निवडणुका घेणं हे आमचं ध्येय आहे. कर्नाटकात 5.22 कोटी मतदार आहेत. नवीन मतदार जोडण्यावरही आमचा भर आहे. ज्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. राज्यात 80 वर्षे वयोगटातील 12.15 लाखांहून अधिक मतदार आहेत. 276 मतदार 100 वर्षांवरील आहेत. निवडणूक आयोग त्यांच्यासाठी विशेष मदत करेल. एकूण 5.21 कोटी मतदार असून त्यापैकी 2.62 कोटी पुरुष आणि 2.59 कोटी महिला आहेत.

ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला डॉक्टरनं मारली उडी

ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला डॉक्टरनं खाली उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या या महिला डॉक्टरवर सध्या उपचार सुरू आहेत. अर्ध्या तासापूर्वी हा प्रकार घडला. महिला डॉक्टरची ओळख अद्याप पटलेली नाही. महिला डॉक्टरनं नेमकी उडी का मारली हेही अद्याप स्पष्ट झालं नाही. बंडगार्डन पोलीस आणि ससून रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार; NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा

जळगाव : सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुरु असलेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची सुनावणी 10 एप्रिलला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची सुनावणी आता 10 एप्रिलला होणार आहे. कोर्टाकडून सातत्याने नव्या तारखा दिल्या जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली नाही. घटनापीठाचे एका वेगळ्या विषयावर कामकाज सुरू असल्यामुळं ही सुनावणी झाली नाही.

राष्ट्रवादीचे नेते मोहम्मद फैजल यांची लोकसभेतील अपात्रता रद्द

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात राजकारण तापले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. खासदारकी रद्द झालेले राष्ट्रवादीचे नेते मोहम्मद फैजल यांची लोकसभेतील अपात्रता रद्द करण्यात आली आहे.

देशात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढला, 24 तासांत 2151 नव्या रुग्णांची नोंद

देशभरात कोरोना संसर्गानं पुन्हा एकदा जोर पकडलाय. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा भारतात कोरोना व्हायरसनं थैमान घालायला सुरुवात केलीये. गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे विक्रमी रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, देशभरात कोरोनाची एकूण 2,151 प्रकरणं नोंदली गेली आहेत. गेल्या 24 तासांत गेल्या पाच महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. या काळात 1,222 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. कोविडची सक्रिय प्रकरणं आता 11,903 झाली आहेत. यापूर्वी, काल म्हणजेच मंगळवारी देशात १,५७३ कोरोना रुग्ण आढळले होते.

गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मंगेशकर रूग्णालय दाखल करण्यात आलं आहे. याबाबत तासाभरात मेडिकल बुलेटिन देखील जाहीर करण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते लाईफसपोर्टवर आहेत, अशी माहिती मंगेशकर रुग्णालयाचे माहिती अधिकारी शिरीष याडगिकर यांनी दिली.

जालनात ठाकरे गटाकडून भाजपला धक्का

जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील कडेगाव सोसायटी निवडणूक पार पडली. या सोसायटीमध्ये महाविकास आघाडीनं 13 पैकी 13 जागा जिंकत भाजपचा सुफडा साफ केला. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या उपस्थितीत विजयी मिरवणूक काढण्यात आली.

शिर्डीतील साई मंदिर रात्रभर खुले राहणार

उद्या (गुरुवार) 30 मार्चला देशभरात रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. या रामनवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदिरात (Sai Temple Shirdi) तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळं 30 मार्चला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहाणार आहे. आजपासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सुरुवात होत आहे.

राज्यासह देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Ram Navami : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी; रामनवमीनिमित्त संस्थाननं घेतला मोठा निर्णय!

गडचिरोली सिरोंचा तालुक्यात ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी

गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील मोयबिनबेटा गावात ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने 40 महिला मजूर जखमी झाले आहेत. मिरची तोडणीचे काम करून परत येत असताना काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 38 महिला मंजूर किरकोळ जखमी तर बारा महिला मजुरांना गंभीर दुखापत झालेली आहे. गंभीर झालेल्या महिला मजुरांना तेलंगणा राज्यातील मंचरियाल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात लोअर परळ येथील एनएम जोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचा आज दिक्षांत समारंभ

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचा आज 59 वा दिक्षांत समारंभ आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहेत. 66457 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार आहे.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात दोन गटात दगडफेक

दोन गटात तुफान दगडफेक झाल्यामुळं जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात तणावाचं वातावरण आहे. अज्ञात जमावाकडून पाळधी पोलीस स्टेशनवरही दगडफेक झाली आहे. यात एका पोलिसासह तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

राज्यासह देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार; आयोगाची आज पत्रकार परिषद

पलानीस्वामींकडं अण्णाद्रमुकची सूत्रं; सरचिटणीसपदी झाली निवड

चेन्नई - माजी मुख्यमंत्री ई.के. पलानीस्वामी यांची आज अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. यानुसार आता संपूर्ण पक्षावर पलानीस्वामी यांचे नियंत्रण राहणार आहे. अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी यांच्या सरचिटणीसपदाला आव्हान देणारी पनीरसेल्वम यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर पलानीस्वामी यांचा सरचिटणीसपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर पलानीस्वामी समर्थकांनी आनंद व्यक्त करत लाडू वाटले. 

एप्रिलमध्ये होणार 30 हजार शिक्षकांची भरती

राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत ३२ हजार शिक्षक कमी आहेत. तर माध्यमिक शाळांमध्येही २९ हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी त्यातील ३० हजार पदांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून केली जाणार आहेत. ‘टेट’चा निकाल जाहीर झाल्याने एप्रिलमध्ये भरती प्रक्रियेला सुरवात होणार असून १२ जूनपूर्वी पदे भरली जाणार आहेत.

Latest Marathi News : सध्या महाराष्ट्रात सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. सावरकरांवरील वादावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांना सल्ला दिलाय. शिवाय, राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. अतिक अहमदचं प्रकरणही गाजत आहे, त्याला शिक्षा सुनावण्यात आलीये. तसंच देशभरातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com