राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदा; सुप्रीम कोर्टानं फटकारलं : Shiv Sena Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

Shiv Sena Case: राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदा; सुप्रीम कोर्टानं फटकारलं

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या भूमिका बेकायदा ठरवल्या आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावरुन राज्यपालांनी कारवाई सुरु करणं चुकचं होतं, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

निकाल देताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, "महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घेतलेले निर्णय हे भारतीय राज्यघटनेनुसार नव्हते. असंतुष्ट आमदारांना सरकारला पाठिंबा काढून घ्यायचा आहे, असं सूचित करणाऱ्या कोणत्याही संवादावर राज्यपालांनी भूमिका घेता कामा नये. उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावलं असल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी राज्यपालांनी शिंदे गटाच्या ठरावावर अवलंबून राहिले ही त्यांनी चूक होती, असंही सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना म्हटलं आहे"