मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र 'अव्वल'

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

''महाराष्ट्रात बालकांना दत्तक घेण्याचा दर जास्त असण्याचे कारण महाराष्ट्र राज्य मोठे असणे हे नसून, राज्यात मोठ्या संख्येने दत्तक घेणाऱ्या संस्था कार्यरत आहेत.''

- लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार, सीईओ, 'सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अॅथोरिटी'

नवी दिल्ली : देशात 6 वर्षामध्ये जवळपास 60 टक्के बालकांना दत्तक घेतले जात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण सर्वाधिका असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यामध्ये मुलींना दत्तक घेण्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. याबाबतची आकडेवारीही जारी करण्यात आली. 

2017-18 या वर्षामध्ये 3,276 बालकांना दत्तक घेण्यात आले असून, यामध्ये 1,856 मुलींचा समावेश आहे. माहिती अधिकारात याबाबत माहिती विचारण्यात आली होती. त्यानुसार ही माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 2017 साली एकूण 642 बालकांना दत्तक घेण्यात आले होते. यामध्ये 353 मुलींचा समावेश असून, उर्वरित मुलांचा समावेश आहे. त्यानंतर कर्नाटकात 286 बालकांना दत्तक घेण्यात आले होते. त्यापैकी 167 मुलींचा समावेश आहे.  

''महाराष्ट्रात बालकांना दत्तक घेण्याचा दर जास्त असण्याचे कारण महाराष्ट्र राज्य मोठे असणे हे नसून, राज्यात मोठ्या संख्येने दत्तक घेणाऱ्या संस्था कार्यरत आहेत,'' अशी माहिती 'सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अथोरिटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार यांनी दिली. 

Web Title: Maharashtra tops in adoption of girls