न्यायदानात महाराष्ट्र अव्वल

पीटीआय
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

न्यायदानात महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरले असून, त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागला अाहे. टाटा ट्रस्टच्या अहवालात न्यायदानाबाबत राज्याच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्येच्या राज्यात गोव्याने न्यायदानात पहिले स्थान पटकाविले आहे. त्यानंतर सिक्कीम अणि हिमाचल प्रदेशचा नंबर लागतो.

नवी दिल्ली - न्यायदानात महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरले असून, त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागला अाहे. टाटा ट्रस्टच्या अहवालात न्यायदानाबाबत राज्याच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्येच्या राज्यात गोव्याने न्यायदानात पहिले स्थान पटकाविले आहे. त्यानंतर सिक्कीम अणि हिमाचल प्रदेशचा नंबर लागतो. 

भारतीय न्याय अहवाल २०१९ तयार करण्यात आला असून, यासाठी पोलिस, न्याय विभाग, तुरुंग आणि कायदे सल्लागार यांचा आधार घेतला आहे. 
या अहवालाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. बी. लोकूर यांनी केले. आपल्या न्यायव्यवस्थेतील काही मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे, असे ते यावेळी म्हणाले.  देशभरात १८ हजार २०० न्यायाधीश असून, सुमारे २३ टक्के जागा रिक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra tops in judgment