महात्मा गांधीच्या पुतळ्याचे 'भगवीकरण'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भगवा रंग लावण्याचा प्रकार उत्तरप्रदेशातील शहजानपूर जिल्ह्यामध्ये घडला आहे. आज ता.(03) हे भगवीकरण करण्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. या आधी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भगवा रंग लावण्याचा प्रकार उत्तर प्रदेशात घडला होता. भारतातल्या थोर व्यक्तिंचे भगवीकरण भाजपा करत असल्याचा आरोप यावरून विरोधक करत आहेत.

शहजानपूर- महात्मा गांधींच्या पुतळ्याला भगवा रंग लावण्याचा प्रकार उत्तरप्रदेशातील शहजानपूर जिल्ह्यामध्ये घडला आहे. आज ता.(03) हे भगवीकरण करण्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. या आधी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भगवा रंग लावण्याचा प्रकार उत्तर प्रदेशात घडला होता. भारतातल्या थोर व्यक्तिंचे भगवीकरण भाजपा करत असल्याचा आरोप यावरून विरोधक करत आहेत.

शहाजहानपूर जिल्ह्यातल्या घनश्यामपूर य़ेथील बांदा पोलिस ठाण्यात या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली आहे. महात्मा गांधींचा हा पुतळा 20 वर्ष जुना आहे. गांधींचा चश्मा व काठी काळ्या रंगात रंगवलेली होती तर बाकी सगळा पुतळा पांढऱ्या रंगाचा होता. परंतु, आता चश्मा सोडला तर आख्खा पुतळा भगवा करण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेसने हे भाजपाचं कृत्य असल्याचं सांगत या प्रकाराला विरोध करणार असल्याचं म्हटलं आहे. हा प्रकार आजच निदर्शनास आला असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौशल मिश्रा यांनी भाजपवर आरोप करत या कृत्यांपाठीमागे असणाऱ्या व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे. 

Web Title: Mahatma Gandhi statue painted saffron in Shahjahapur