Gandhi : महात्मा गांधी यांची नात उषा गोकाणी यांचं निधन; 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahatma gandhi udha gokani

Gandhi : महात्मा गांधी यांची नात उषा गोकाणी यांचं निधन; 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबईः महात्मा गांधी यांच्या नात उषा गोकाणी यांचं मंगळवारी मुंबई येथे निधन झालं. मणि भवनचे कार्यकारी सचिव मेघश्याम अजगावकर यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. मागच्या पाच वर्षांपासून उषा गोकाणी ह्या आजारी होत्या. मागील दोन वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या.

गोकाणी ह्या गांधी स्मारक निधी, मुंबईच्या त्या माजी अध्यक्ष होत्या. त्यांनी आपलं बालपण वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये घालवलं. २ ऑक्टोबर २०१५ रोजी मणिभवन हे तत्कालीन गांधी मेमोरियल सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आलं.

१९१७ ते १९३४ या काळामध्ये महात्मा गांधी अनेकदा मणिभवनात राहिलेले आहेत. मणिभवन हे स्वातंत्र्यलढ्याचं साक्षिदार आहे. मणिभवनमध्येच गांधी स्मारक निधी आणि मणि भवन गांधी संग्रहालय या संस्था आहेत.

उषा गोकाणी ह्या गांधी स्मारक निधीच्या अध्यक्ष होत्या. आज मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मणिभवनचे कार्यकारी सचिव मेघश्याम आजगावकर यांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली आहे.

2016 मध्ये, उषा गोकाणी यांचे भाऊ आणि महात्मा गांधी यांचे नातू कानू रामदास गांधी यांचे गुजरातमधील सुरत येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. आज उषा यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

टॅग्स :Mahatma Gandhi