प्रत्येक स्वच्छाग्रहीमध्ये महात्मा गांधींचे विचार - पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पाटणा - चंपारण्य सत्याग्रह शताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मोतिहारी येथे पोहोचले. येथे गांधी मैदानात आयोजित सोहळ्यात मोदी 20 हजार स्वच्छाग्रहींना संबोधित करत आहेत. तसेच येथे 'सत्याग्रह ते स्वच्छाग्रह' या अभियानाची सुरुवात होणार आहे. या विषयी बोलताना, 'जे लोक म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही, त्यांनी येथे येऊन पाहावे. शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास साक्षात आमच्या समोर आहे. येथे बसलेल्या प्रत्येक स्वच्छाग्रहीमध्ये महात्मा गांधींचे विचार आणि आदर्शाचा अंश आहे. त्यांच्यातील गांधीजींच्या अंशाला मी नमन करतो.' असे मोदी म्हणाले.

पाटणा - चंपारण्य सत्याग्रह शताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मोतिहारी येथे पोहोचले. येथे गांधी मैदानात आयोजित सोहळ्यात मोदी 20 हजार स्वच्छाग्रहींना संबोधित करत आहेत. तसेच येथे 'सत्याग्रह ते स्वच्छाग्रह' या अभियानाची सुरुवात होणार आहे. या विषयी बोलताना, 'जे लोक म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही, त्यांनी येथे येऊन पाहावे. शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास साक्षात आमच्या समोर आहे. येथे बसलेल्या प्रत्येक स्वच्छाग्रहीमध्ये महात्मा गांधींचे विचार आणि आदर्शाचा अंश आहे. त्यांच्यातील गांधीजींच्या अंशाला मी नमन करतो.' असे मोदी म्हणाले. या सोहळ्याला राज्यपाल सत्यपाल मलिक, मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, राधामोहन सिंह आणि सुशील मोदी उपस्थित आहेत. 

दरम्यान, शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील जातीवर आधारित आरक्षणाविरोधात देण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेला बिहारमध्ये हिंसक वळण लागले आहे. या पर्श्वभूमीवर हिंसा आणि तणाव आपल्या समाजातील प्रश्न सोडवू शकत नाही, यासाठी शांती, एकता, सर्व धर्म आणि जाती यांच्यासाठी आदर असणे आवश्यक आहे. तसेच आपला देश केवळ प्रेम आणि मैत्रिच्या जोरावरच प्रगती करु शकतो असे नीतीश कुमार यांनी म्हटले आहे.

यावेळी पंतप्रधानांनी नीतीश कुमार यांचे कौतुक करत ते सक्षम प्रशासक असून, समाज कंटकांविरोधात लढत असल्याते म्हटले. लालू प्रसाद यादव यांच्यावर निषाणा साधत, भ्रष्टाचाराला आम्ही पाठिशी घालत नाही आणि भ्रष्टाचार विरोधी लढाईसाठी आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही मोंदीनी सांगितले. 

कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वच्छाग्रहींचा मोदींच्या हस्ते सत्कार होणार आहे.

Web Title: Mahatma Gandhi's thoughts in every swachagrahi - narendra modi