यासिन मलिकच्या अटकेवरून भडकल्या मेहबुबा मुफ्ती

Mehbooba Mufti
Mehbooba Mufti

नवी दिल्ली : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या अटकेनंतर भडकल्या आहेत.

मेहबूबा मुफ्ती यांनी यासिनच्या अटकेनंतर केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. त्यांनी त्याच्या अटकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे, की गेल्या 24 तासांत हुर्रियतचे नेते आणि जमात संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणामुळे काश्मीरमधील मुद्द्यांना आणखी हवा मिळणार आहे.

नुकतेच सरकारने फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. तर, शुक्रवारी रात्री यासिन मलिकला अटक केली आहे. ही अटक कशाच्या आधारे झाली आहे, हेही मुफ्ती यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com