कुस्तीपटू मुलींना भाजप नेत्यांपासून संरक्षण का नाही? 'मन की बात'वरून मोईत्रांचा सवाल

mahua moitra and Modi
mahua moitra and Modi

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा 100 वा भाग रविवारी (30 एप्रिल 2023) प्रसारित होणार झाला आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी सरकार आणि भाजपने जोरदार तयारी केली होती. त्यातच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

mahua moitra and Modi
Narendra Modi : 'मन की बात' कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचे प्रकटीकरण; 100व्या भागात मोदींचं प्रतिपादन

भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात राजधानी दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणि अदानी प्रकरणाच्या तपासाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

ट्विटरवरील एका पोस्टमध्ये मोईत्रा यांनी म्हटले की, देशातील खेळाडू मुलींना भाजपच्या बाहुबली नेत्यांकडून संरक्षण का मिळत नाही. यासोबतच त्यांनी अदानी प्रकरणात सुरू असलेल्या सेबीच्या तपासाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, “माननीय मोदीजी – आज मन की बातचा 100 वा भाग यूएन मुख्यालयात प्रसारित होणार आहे. कृपया आम्हाला सांगा, देशातील खेळाडू मुलींना भाजपच्या बाहुबली नेत्यांपासून संरक्षण का मिळू शकत नाही? सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेत सेबी अदानी प्रकरणाचा तपास का पूर्ण करू शकत नाही?

mahua moitra and Modi
Shiv Sena News : युवासेना प्रमुख पदावरून आदित्य-तेजस यांच्यात वाद; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

डब्ल्यूएफआयचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील खेळाडू निदर्शने करत आहेत. त्यांच्यावर काही महिला खेळाडूंनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. आंदोलक खेळाडू ब्रिजभूषण यांना डब्ल्यूएफआयच्या प्रमुख पदासह सर्व पदांवरून हटवण्याची मागणी करत आहेत आणि त्यांना तुरुंगात पाठवण्याचीही मागणी करत आहेत. टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा यांचा पहिला प्रश्न याच मुद्द्याशी संबंधित आहे.

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन कीबात कार्यक्रमात बेटी पढाओ आणि बेची बचाओ नाऱ्याचा पुनरोच्चार केला आहे. मात्र भाजपकडून एवढे आरोप होऊनही ब्रिजभूषण यांची हकालपट्टी करत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com