Video : भारताचे मोठं यश, पहिल्या पायलटविरहित लढाऊ विमानाची यशस्वी चाचणी

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर शुक्रवारी ही चाचणी यशस्वीपणे पार पडली.
maiden flight
maiden flight sakal

नवी दिल्ली : मानवरहित लढाऊ विमानांच्या (Fighter Plane) विकासात भारताला एक मोठे यश मिळाले आहे. डीआरडीओने (DRDo) शुक्रवारी ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी (Autonomous Flying Wing Technology) डेमॉन्स्ट्रेटरच्या पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेतली. या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पायलटशिवाय (Pilot) उड्डाण करू शकते. टेकऑफपासून लँडिंगपर्यंतचे संपूर्ण काम कोणत्याही मानवरहित हस्तक्षेपाशिवाय करता येते हे याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. (Maiden Flight News In Marathi)

चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये झाली चाचणी

या यशस्वी चाचणीबाबत डीआरडीओतर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये कर्नाटकातील चित्रदुर्ग (Chitradurga) येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर शुक्रवारी ही चाचणी यशस्वीपणे पार पडल्याचे सांगण्यात आले आहे. मानवरहित हवाई वाहन म्हणजेच अनमॅन्ड एरियल व्हेईकल (UAV) याला ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर असेही म्हटले जाते.

हे विमान पूर्णपणे ऑटोनॉमस मोडमध्ये संचलित केलेले असून, भविष्यातील पायलटविरहित विमानाच्या विकासातील मैलाचा दगड असल्याचेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आत्मनिर्भतेच्या दिशेनेही हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे विमान बेंगळुरू येथील एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (ADE) डिझाइन आणि विकसित केले आहे. ADE ही DRDO अंतर्गत एक प्रमुख संशोधन प्रयोगशाळा आहे. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com