खूनप्रकरणी मेजरला मेरठमध्ये अटक 

पीटीआय
सोमवार, 25 जून 2018

लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या खूनप्रकरणी रविवारी मेरठमध्ये लष्कराच्या एका मेजरला अटक करण्यात आली, निखील राय हांडा असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. अन्य लष्करी अधिकारी अमित द्विवेदी यांच्या पत्नी शैलजा यांच्या खूनप्रकरणी त्याला पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. 

नवी दिल्ली : लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या खूनप्रकरणी रविवारी मेरठमध्ये लष्कराच्या एका मेजरला अटक करण्यात आली, निखील राय हांडा असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. अन्य लष्करी अधिकारी अमित द्विवेदी यांच्या पत्नी शैलजा यांच्या खूनप्रकरणी त्याला पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. 

शैलेजा द्विवेदी आणि अमित येथील लष्कराच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास होते. अमित हे दिमापूर येथे नोकरीला होते ते काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणासाठी दिल्लीत आले होते. ब्रार स्क्वेअर भागातील रेल्वे प्रोटेक्‍शन फोर्सच्या खानावळीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यानजीक शनिवारी दुपारी शैलजा यांचा मृतदेह आढळून आला होता. हा भाग दिल्ली कॅंटोन्मेंट मेट्रो स्टेशनला लागून आहे. वाहनाच्या धडकेमुळे शैलजा गंभीर जखमी झाल्या होत्या. शैलजा यांच्या गळ्यावर सुरा फिरविण्यात आला होता त्यानंतर त्यांना गाडीखाली चिरडण्यात आले. या प्रकरणातील संशयिताच्या भावाचीही चौकशी करण्यात आली आहे. 

Web Title: Major arrested at Meerath in murder case