मोदींकडून गडकरींचे पंख कापण्याचा प्रयत्न सुरु? (व्हिडिओ)
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या दळणवण मंत्रालयाच्या निधीत लक्षणीय कपात करण्यात आली आहे. 'नमामी गंगे' आणि 'खेत को पाणी' या योजनेच्या निधीत ही लक्षणीय कपात केली आहे. गडकरींच्या मंत्रालयाच्या निधीत ही केलेली कपात पाहून मोदींकडून नितीन गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न चालू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
नवी दिल्ली- केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या दळणवण मंत्रालयाच्या निधीत लक्षणीय कपात करण्यात आली आहे. 'नमामी गंगे' आणि 'खेत को पाणी' या योजनेच्या निधीत ही लक्षणीय कपात केली आहे. गडकरींच्या मंत्रालयाच्या निधीत ही केलेली कपात पाहून मोदींकडून नितीन गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न चालू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
गेल्या काही दिवसापासून गडकरींनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचाच त्यांना फटका बसला असल्याचे सध्या बोलले जात आहे. निधीमध्ये कपात करून गडकरींचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात गडकरींच्या नमामी गंगेला अवघे 750 कोटी रूपये देण्यात आले आहेत. याआधी हा निधी 2300 कोटी रूपये एवढा होता. तर हर खेत को पाणी या योजनेला या अर्थसंकल्पात 903 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याआधी याच योजनेला 2181 कोटी रूपये एवढा निधी होता.