काँग्रेसमध्ये मतभेद; पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जून 2019

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पदावरून हटवून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना या पदावर नेमावे, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार पृथ्वीराज मीणा यांनी आज (ता.05) बुधवारी केली. ते तोडाभीम मतदारसंघाचे आमदार आहेत. 

जयपूर ः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पदावरून हटवून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना या पदावर नेमावे, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार पृथ्वीराज मीणा यांनी आज (ता.05) बुधवारी केली. ते तोडाभीम मतदारसंघाचे आमदार आहेत. 

लोकसभा निवडणुकीत सत्तारूढ कॉंग्रेसचा धुव्वा उडाल्यापासून पक्षात अस्वस्थता आहे. पराभवाची जबाबदारी गेहलोत यांनी स्वीकारावी, असेही मीणा यांचे म्हणणे आहे. पक्ष सत्तेत असताना पराभवाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते आणि पक्ष विरोधात असताना पक्षाध्यक्षांची ही जबाबदारी असते, असे ते म्हणाले. मात्र, सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदी आणावे, ही माझी वैयक्तिक मागणी असल्याचे मीणा यांनी स्पष्ट केले.

गेहलोत यांचा मुलगा वैभव याचा जोधपूरमध्ये पराभव झाला असून, त्याची जबाबदारी पायलट यांनी घ्यावी, असे मत अशोक गेहलोत यांनी नुकतेच व्यक्त केले होते. त्याबाबत मीणा यांनी नापसंती व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make Sachin Pilot Rajasthan CM Demands Congress MLA Prithviraj Meena