अपहरण करून अभिनेत्री भावनाचा विनयभंग

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

भावना हिने या प्रकरणात चालकाचा समावेश असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आतापर्यंत भावनाने 75 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे.

कोच्ची - मल्याळी अभिनेत्री भावना हिचे अपहरण करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

कोच्ची शहरातील अथनी येथून भावनाचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार तिने पोलिसांत दाखल केली आहे. अपहरणकर्त्यांनी तिला 25 किमी अंतर दूर नेत पलारीवेट्टम येथे सोडून दिले. अथनीजवळ भावनाची कार अडवून, आरोपींची टोळी गाडीत घुसली. त्यानंतर चालत्या गाडीत विनयभंग केल्याचा आरोप, भावनाने केला आहे. भावनाने आपला व्हिडिओ व फोटो काढल्याचे म्हटले आहे.

भावना हिने या प्रकरणात चालकाचा समावेश असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आतापर्यंत भावनाने 75 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. या प्रकारानंतर भावनाने कक्कानंद परिसरातील एका दिग्दर्शकाच्या घरी आसरा घेत पोलिसांनी सर्व माहिती दिली.

Web Title: Malayalam actress Bhavana abducted & molested, one held