मल्याळम चित्रपटनिर्मातीचा तिच्याच घरात आढळला मृतदेह

वृत्तसंस्था
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

युवा मल्याळम चित्रपटनिर्माती नयना सूर्यन हिचा मृतदेह तिच्या घरातच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

तिरुअनंतपुरम : युवा मल्याळम चित्रपटनिर्माती नयना सूर्यन हिचा मृतदेह तिच्या घरातच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

वेल्लमबला जवळील अल्थरा येथील निवासस्थानी 28 वर्षीय नयनाचा मृतदेह आढळून आला. तिने अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केलेले आहे. तिच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाचा शोध घेण्यात येत असून, शिवविच्छेदनानंतर सर्व उजेडात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयना ही गेल्या अनेक दिवसांपासून मधुमेहाचे उपचार घेत होती. तिने शेवटी आलेले अनेक फोन उचलले नसल्याचे तिच्या मोबाईलवरून स्पष्ट होते. नयनाच्या आईने तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. दारातच तिन गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malayalam filmmaker Nayana Sooryan found dead at her Thiruvananthapuram residence