भारतात परतायचेय पण पासपोर्टची अडचण-मल्ल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली- बँकांचे कर्ज थकवून लंडनमध्ये मुक्काम ठोकणारे कुप्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतामध्ये परतायचे आहे. परंतु, पासपोर्ट रद्द केल्यामुळे भारतात परतण्याच अडचण निर्माण झाली आहे, असे मल्ल्या यांनी आज (शुक्रवार) न्यायालयात सांगितले. 

नवी दिल्ली- बँकांचे कर्ज थकवून लंडनमध्ये मुक्काम ठोकणारे कुप्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतामध्ये परतायचे आहे. परंतु, पासपोर्ट रद्द केल्यामुळे भारतात परतण्याच अडचण निर्माण झाली आहे, असे मल्ल्या यांनी आज (शुक्रवार) न्यायालयात सांगितले. 

विजय माल्ल्या यांच्या वकिलाने पतियाला न्यायालयात सांगितले की, ‘मल्या हे भारतात येण्यास तयार आहेत. परंतु, भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केल्यामुळे त्यांना भारतात परतणे शक्य नाही.‘ माल्ल्या यांच्या वकिलाने न्यायालयात हजर राहण्यातून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) उत्तर मागितले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. 

दरम्यान, ‘ईडी‘ने मल्ल्या यांची 6630 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. यात मल्ल्या यांचे अलिबागमधील फार्महाउस, फ्लॅट बॅंकांमधील एफडी आणि शेअर्सचा समावेश आहे.  "ईडी‘ची ही दुसरी कारवाई आहे. याआधी "ईडी‘ने 1400 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. आतापर्यंत "ईडी‘ने याप्रकरणी मल्ल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांची एकूण 8044 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. लालबाग मांडवा येथील मल्ल्या यांच्या फार्महाउसची किंमत 25 कोटी आहे. बंगळूरमधील काही फ्लॅट्‌स जप्त करण्यात आले असून, त्याचे मूल्य 565 कोटी आहे. त्याचबरोबर बॅंकांमधील सुमारे 10 कोटींच्या ठेवी आणि यूबीएल आणि इतर कंपन्यांचे 3635 कोटींचे शेअर जप्त करण्यात आले आहेत. या मालमतेची मूळ किंमत 4234.84 कोटी असून, बाजारभावाप्रमाणे 6630 कोटी असल्याचे "ईडी‘ने म्हटले आहे.

Web Title: mallya

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी