मल्ल्याला फरारी गुन्हेगार घोषित करण्याची तयारी 

पीटीआय
शनिवार, 23 जून 2018

विविध बॅंकांकडून 9 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेऊन मल्ल्या फरार झाला आहे. त्याला लंडनहून परत आणून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न भारतातर्फे केला जात आहे. 

नवी दिल्ली : फरारी आर्थिक गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी अलीकडेच बनविण्यात आलेल्या नव्या कायद्यांतर्गत सरकारने पहिले पाऊल मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याविरुद्ध उचलले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्ल्याला या कायद्यांतर्गत "फरारी गुन्हेगार' घोषित करणे आणि त्याची 12,500 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. 

अलीकडेच एका अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आलेल्या या नव्या कायद्यांतर्गत कर्ज न भागवणाऱ्या फरारी गुन्हेगारांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा अधिकार आहे. मल्ल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अर्जात भारतीय तपास संस्थांपासून बचाव करताना परदेशात राहात असलेल्या या मध्य व्यावसायिक आणि त्याच्या कंपन्यांची सुमारे 12,500 कोटी रुपयांची संपत्ती तातडीने जप्त करण्याची परवानगी मागितली आहे. यामध्ये स्थावर मालमत्तेचाही समावेश आहे.

विविध बॅंकांकडून 9 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेऊन मल्ल्या फरार झाला आहे. त्याला लंडनहून परत आणून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न भारतातर्फे केला जात आहे. 

Web Title: Mallya absconding criminals Preparing to announce