मल्ल्याच्या अडचणीत वाढ; दिवाळखोरी प्रक्रियेवर लवकरच सुनावणी

पीटीआय
बुधवार, 19 डिसेंबर 2018

लंडन : उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधात दिवाळखोरीच्या प्रक्रियेवर ब्रिटनमधील उच्च न्यायालयात पुढील वर्षी सुनावणी होणार असल्याची माहिती टीएलटी एलएलपी या विधी सल्लागार कंपनीने दिली आहे. यामुळे मल्ल्याला नवीन वर्षात आणखी एक धक्का बसण्याची शक्‍यता आहे. 

भारताच्या मागणीनुसार विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला येथील वेस्टमिनिस्टर न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिली असून, आता त्याला दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. मल्ल्याकडील थकीत (1.145 अब्ज पौंड) कर्जाच्या वसुलीसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील भारतीय बॅंकांच्या गटाने दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आली आहे. या याचिकेवर 2019 मध्ये पहिल्या सहा महिन्यांत सुनावणी होणे अपेक्षित असल्याचे टीएलटी एलएलपीने स्पष्ट केले. 

दरम्यान, मल्ल्याची जगभरातील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यास ब्रिटन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मे महिन्यात झालेल्या सुनावणीत नकार दर्शवला होता. सध्या जामीनावर बाहेर असलेल्या मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर ब्रिटनच्या गृहमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब होणे बाकी असून, त्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Web Title: Mallyas Problems increasing hearing soon