'नोटाबंदीला विरोध करताना देशहिताचा विचार नाही'

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांनी ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार न करता राजकारण करत असल्याचे म्हटले आहे. तर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत बोलताना त्यांनी राहुल गांधी नेता म्हणून उभे राहावे म्हणून ते विरोध करत असल्याचे म्हटले आहे. 'निवडणूक प्रक्रियेतील, दहशतवादातील ड्रग माफियांकडील काळा पैसा बंद होणार असून बनावट चलनही बंद होणार आहे. हे सर्व धोके दूर व्हावेत असे ममता बॅनर्जींना वाटते का? जर याचे उत्तर हो असेल तर त्यांनी असे प्रश्‍न उपस्थित करू नयेत', असेही शायना पुढे म्हणाल्या. बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. देशभरातील नागरिक पैसे घेण्यासाठी एटीएम आणि बॅंकांसमोर रांगा लावत असल्याचे सांगताना त्यांनी एटीएम आता "ऑल टाईम मनी' नव्हे तर "आएगा तब मिलेगा' असे झाले असल्याचे म्हटले आहे. यावेळी बॅनर्जी यांच्यासोबत शिवसेना, नॅशनल कॉन्फरन्स आणि आम आदमी पक्षाचे नेतेही उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीका केली. नोटा बंद करण्याचा निर्णयापूर्वी पुरेसे व्यवस्थापन केले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपद भूषविलेले राष्ट्रपती मुखर्जी या परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य तो निर्णय घेतील असा आशावादही व्यक्त केला.

Web Title: Mamata’s demonetisation war against nation’s interest, says BJP