भाजपकडून धर्माचे राजकारण - ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

भारतीय जनता पक्ष हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. भाजप धर्माचे राजकारण करत आहे. अशी टीका आज (ता.21) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. 

कोलकता - भारतीय जनता पक्ष हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. भाजप धर्माचे राजकारण करत आहे. अशी टीका आज (ता.21) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. 

भाजप ही देशातील दहशतवादी संघटना आहे. आम्ही त्यांच्यासारखे धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची ममता बॅनर्जी यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकवेळा त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कटू शब्दात टीका केलेली आहे. यापूर्वी भाजप हा हिंसाचाराचे समर्थन करणारा पक्ष आहे अशी टीका त्यांनी केली आहे. यावेळी मात्र, त्यांनी भाजप ही दहशतवादी संघटना असल्याचाच आरोप केला आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातही त्यांनी अनेकवेळा टीका केली आहे. सध्या सत्तेत असलेल्या भाजपला त्या वेळोवेळी टीकेचे लक्ष्य करताना दिसून आल्या आहेत. भाजपनेही ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्याच्या संधी सोडलेल्या नाहीत. भाजप नेत्यांनीही अनेकवेळा ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

Web Title: mamata banarjee criticise on BJP