आम्ही मोदींचे नोकर आहोत का? ः बॅनर्जी 

आम्ही मोदींचे नोकर आहोत का? ः बॅनर्जी 

गोपीबल्लावपूर ः "फणी' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी खरगपूरमध्ये आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकत्यातील माझ्या कार्यालयात केलेल्या दूरध्वनीवेळी मी उपलब्ध होऊ शकले नाही, असा दावा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला.

मोदी जातील तेथे उपस्थित राहण्यास आम्ही त्यांचे नोकर आहोत का? मी त्यांना सहकार्य केले नाही, असा कांगावा आता ते करतील, अशा शब्दांत बॅनर्जी यांनी मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.येथील प्रचार सभेत बोलताना बॅनर्जी यांनी मोदींनी केलेले आरोप फेटाळून लावले.

पश्‍चिम बंगालमधील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांत थांबून मी परिस्थितीचा आढावा घेत आहे. त्यामुळे माझ्या कार्यालयात मोदींनी केलेल्या दूरध्वनीवर मी उपलब्ध होऊ शकले नाही,'' असे बॅनर्जी म्हणाल्या.

ओडिशातील मतदान पार पडले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अद्याप मतदान झालेले नाही. माझा नियोजित दौरा आधीच ठरलेला होता. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात "एक्‍स्पायरी' पंतप्रधानांसोबत एकाच व्यासपीठावर मी काय म्हणून उपस्थित राहू, असा प्रश्नही बॅनर्जी यांनी उपस्थित केला. 

सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे "एक्‍स्पारी' पंतप्रधानांबरोबर कुठल्याही व्यासपीठावर उपस्थित राहण्याची माझी इच्छा नाही. 
- ममता बॅनर्जी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com