
आगामी निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत करु. जर असे झाले नाही तर राजकारणातून सन्यास घेऊ, असे आव्हान दिले होते.
कोलकाता- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एक दिवस आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम येथून निवडणूक लढण्याचे आव्हान स्वीकारणारे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी पुन्हा त्यांच्यावर पलटवार केला आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपत गेलेले नंदीग्रामचे आमदार अधिकारी यांनी ममता बॅनर्जींनी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले लेटर पॅड तयार ठेवावे, असा खोचक सल्ला दिला आहे. पूर्व मिदनापूरमधील खेजुरी येथे आयोजित रॅलीत सुवेंदू अधिकारी बोलत होते.
सोमवारी सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला होता की, जर त्यांना नंदीग्राम येथून उमेदवारी देण्यात आली तर आगामी निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत करु. जर असे झाले नाही तर राजकारणातून सन्यास घेऊ, असे आव्हान दिले होते. त्यापूर्वी नंदीग्राममध्ये येथे आयोजित सभेत ममता बॅनर्जी यांनी घोषणा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आपला पारंपारिक भवानीपूर मतदारसंघासह यावेळी आपण नंदीग्राम येथूनही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा- अर्णब चॅट प्रकरणावरून राहुल गांधी पहिल्यांदा बोलले
She (Mamata Banerjee) will contest elections from Nandigram. She should get a letter pad ready with the words 'former CM' written on it: BJP leader Suvendu Adhikari during a rally in Khejuri, Purba Medinipur district#WestBengal pic.twitter.com/rhol8E00Su
— ANI (@ANI) January 19, 2021
तत्पूर्वी ममता बॅनर्जी यांनी पुरुलिया येथील सभेत भाजपवर हल्लाबोल केला होता. भाजप नक्षलवाद्यांपेक्षा जास्त धोकादायक असल्याचा आरोप केला होता. विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी खोट्या बातम्या व्हॉट्सअप ग्रूपवर आयटी सेलच्या माध्यमातून पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा- अरुणाचलमध्ये चीनने गावच नाही, तर मिलिट्री कॅम्पही वसवलेत; भाजप खासदाराची कबुली