ममता बॅनर्जी यांनी घेतली शरद पवार, संजय राऊत यांची भेट

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आजपासून (मंगळवार) दिल्ली दौरा सुरू झाला. निवडणुकीपूर्वी संभाव्य आघाडीच्या चाचपणीसाठी ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. बॅनर्जी यांनी आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. 

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपेतर पक्षांची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेशीही ममता बॅनर्जी चर्चा करणार आहेत. त्यासाठी आज त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली. या दोन्ही भेटींमध्ये काय चर्चा झाली, याचे तपशील समजू शकलेले नाहीत. याशिवाय राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या मिसा भारती यांचीही बॅनर्जी यांनी भेट घेतली. 

"राजकीय नेते भेटतात, तेव्हा अर्थातच राजकारणावरच चर्चा करतात. यात लपविण्यासारखे काही नाही. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे', अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. भाजपमधील नाराज नेते यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि इतरांचीही उद्या भेट घेणार असल्याचे बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Mamata Banerjee meets Sharad Pawar, Sanjay Raut in Delhi