BSF जवान लोकांना मारतायत, त्यांना बंगालात घुसू देऊ नका : ममता बॅनर्जी

Mamata Banerjee
Mamata Banerjeeesakal
Summary

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा बीएसएफविरोधात आक्रमक भूमिका घेलीय.

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुन्हा एकदा बीएसएफविरोधात आक्रमक भूमिका घेलीय. ममता यांनी कूचबिहार जिल्ह्याच्या पोलिस (West Bengal Police) अधीक्षकांना बीएसएफविरोधात निर्देश दिले आहेत. तुम्ही बीएसएफला सीमेपासून 50 किमी आत प्रवेश करू देऊ नका. कारण, बीएसएफचे जवान (BSF Soldier) बांगलादेशात, खेड्यापाड्यात घुसून लोकांना मारत आहेत आणि त्यांचे मृतदेह फेकून देत आहेत, असे पोलिसांना आदेश दिले आहेत.

ममता पुढं म्हणाल्या, गुरे तस्करांच्या नावाखाली बीएसएफचे जवान लोकांना गोळ्या घालून इतर राज्यात फेकत आहेत. माझ्या रेल्वे मंत्रालयातील वास्तव्यादरम्यान मी अशी अनेक प्रकरणं पाहिली आहेत. मृतदेह कसे गायब होतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. सीमेवरील बीएसएफची त्रिज्या 50 किमीपर्यंत वाढवण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशाला ममता बॅनर्जींनी कडाडून विरोध केलाय.

Mamata Banerjee
'दीपाली सय्यदांच्या वक्तव्यामागं दहशतवादी संघटनेचा हात? गुन्हा दाखल करा'

याआधीपासून ममता बॅनर्जी बीएसएफविरोधात सतत वक्तव्ये करत आहेत. यापूर्वी ममतांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बीएसएफच्या कारवायांवर लक्ष ठेवलं पाहिजे, असं सांगितले होतं. बीएसएफला त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर कारवाई करू देऊ नये, अशा सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या. कारण, कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये ममता यांनी बीएसएफच्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्याविरोधात विधानसभेत ठराव मांडला होता. सीमेच्या 50 किमीपर्यंतच्या परिसरात बीएसएफच्या अटक, शोध आणि जप्तीला ममता सतत विरोध करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com