Cyclone Fani : पीएमओकडून आलेल्या फोनवर बोलण्यास ममता यांचा नकार

Cyclone Fani : पीएमओकडून आलेल्या फोनवर बोलण्यास ममता यांचा नकार

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) फोन आला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील फणी वादळासंदर्भात ममता बॅनर्जी यांना फोन करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याकडून राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला. तसेच ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी फोन केला होता. मात्र, त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलण्याचे टाळले होते. त्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांना फोन करण्यात आला. पण ममता बॅनर्जी यांनी बोलण्यास नकार दिला. 

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या या आरोपानतर पंतप्रधान कार्यालयाने सांगितले, की पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनीच फोन घेण्यास नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com