२०२४ मध्ये भाजपला बंगालमध्ये नो एंट्री, सर्वशक्तीनिशी लढणार : ममता बॅनर्जी

भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Mamta Banerjee
Mamta BanerjeeSakal

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी पुन्हा एकदा भाजपावर (BJP) हल्लाबोल केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रवेश मिळणार नसून त्यांचा पराभव निश्चित आहे. एवढेच नव्हे तर, आगामी लोकसभा निवडणुकीत बंगालमध्येही यश मिळणार नाही, असा विश्वास ममता यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत हे फार काळ टिकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पुरुलिया येथील आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. (Mamata Banerjee Attack On BJP Government )

Mamta Banerjee
'2024 मध्ये ममता बॅनर्जी राष्ट्रपतींकडून पंतप्रधान पदाची शपथ घेतील'

भाजप केंद्रीय एजन्सीचा वापर करून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असून, तपास एजन्सी फक्त काही मोजक्या लोकांवरील कारवाईसाठी असल्याचा आरोप करत भाजपच्या नेत्यांसाठी नाहीत का? असा सवाल बॅनर्जी यांनी यावेळी उपस्थित केला. केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकार भेसळयुक्त असल्याचेही त्या म्हणाल्या. या सरकारने नोटाबंदीसारख्या विनाशकारी निर्णयाद्वारे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असून, हा एक मोठा घोटाळा होता, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.

Mamta Banerjee
भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष - संजय राऊत

माझ्या सर्व शक्तीनीशी लढणार

दरम्यान, पुरुलियाच्या मातीने आणि बंगालच्या मातीने मला लोकांसाठी लढण्याचे बळ दिले आहे. मला कोणाचीच भीती वाटत नसून, 2024 च्या निवडणुकांमध्ये सर्व शक्तीनिशी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com