'नोटाबंदीच्या विरोधासाठी बॅनर्जींकडून प्रत्येक गोष्टीचे राजकारण'

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

बंगळूर - नोटांबदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रत्येक मुद्याचे राजकारण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

बंगळूर - नोटांबदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रत्येक मुद्याचे राजकारण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली. "पश्‍चिम बंगाल हा भारताचा एक भाग आहे. हा भाग भारतीय राज्यघटनेला बांधील आहे. मात्र बॅनर्जी यांना खरोखरच संपूर्ण पश्‍चिम बंगालवर केवळ त्यांचेच राज्य असल्याचे वाटते. लष्कर निष्पक्षपणे प्रत्येक राज्यात सेवा देत आहे. त्या केवळ नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रत्येक मुद्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत' अशा शब्दांत प्रकाश यांनी टीका केली.

पश्‍चिम बंगालमध्ये लष्कर आढळून आल्याच्या मुद्यावरून ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर लष्करावर टीका केल्याने वेदना झाल्याचे म्हणत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बॅनर्जी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतरही बॅनर्जी 'नागरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करताना राज्य सरकारची परवानगी घेतली नाही', असा आरोपावर ठाम आहेत.

Web Title: Mamata politicising everything in wake of demonetisation: BJP