'मम्मा, आय लव्ह यू' लिहून बालिकेची आत्महत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

''आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये तिने यामध्ये लिहिले, की 'मम्मा, आय लव्ह यू...आयएम लिव्हिंग धिस वर्ल्ड' (मी हे जग सोडून जात आहे).

- समीर शर्मा, अतिरिक्त पोलिस उपायुक्त (पश्चिम)

नवी दिल्ली : एका 12 वर्षीय बालिकेने 'मम्मा, आय लव्ह यू' लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. दिल्लीतील इंदरपुरी येथे ही घटना घडली. याबाबतची समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित बालिकेच्या आईने शिक्षकावर आरोप केले आहेत. 

संबंधित बालिका सातवीमध्ये शिक्षण घेत होती. तिने 1 डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास आत्महत्या केली. तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी एका टांगलेल्या खोलीत आढळला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये तिने यामध्ये लिहिले, की 'मम्मा, आय लव्ह यू...आयएम लिव्हिंग धिस वर्ल्ड' (मी हे जग सोडून जात आहे) अशी माहिती अतिरिक्त पोलिस उपायुक्त (पश्चिम) समीर शर्मा यांनी दिली. बालिकेच्या आईने जे आरोप केले आहेत त्या आरोपावरून आम्ही पुढील चौकशी करणार आहोत. जेव्हा बालिकेची आई घरी परतली. तेव्हा ही घटना समोर आली, असे शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, बालिकेच्या आईने सांगितले, की माझ्या मुलीला संबंधित शिक्षक दररोज धमकावत असे. शुक्रवारी तोच शिक्षक तिला 10 मिनिटे ओरडत होता. त्यानंतर ती शाळेच्या स्वच्छतागृहात जाऊन रडत होती.

Web Title: Mamma I love you 12 years old wrote before suicide mother blames teacher