ममता बॅनर्जी भ्रष्ट व्यक्तींच्या वकील: भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीला विरोध करत भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चोख प्रत्युत्तर देत त्या भ्रष्ट व्यक्तींची वकिली करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीला विरोध करत भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चोख प्रत्युत्तर देत त्या भ्रष्ट व्यक्तींची वकिली करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीकांत शर्मा म्हणाले, "ममता बॅनर्जी भ्रष्ट आणि काळा पैसा धारकांची वकिली करत आहेत. त्यांनी राज्यातील काळा पैसाधारकाने संपवावे यासाठी जनतेने त्यांनी मत दिले होते. मात्र, आता त्या स्वत: त्या लोकांची वकिली करत आहेत. पश्‍चिम बंगालमधील जनता त्यांना लवकरच चोख प्रत्युत्तर देईल.' बॅनर्जी यांनी मंगळवारी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करत केंद्र सरकार "भाजप असे सूडाचे राजकारण का करत आहे. आमच्या पक्षाच्या काही नेत्यांना तीन वेळा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा फोन आला होता. नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही', असा आरोप केला होता. तर आजही तमिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यांसंदर्भात बोलताना "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर छापा का टाकत नाहीत?' असा प्रश्‍न उपस्थित केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamta Banerjee advocate for corrupt people : BJP