
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या विरोधातील मतांचे विभाजन करण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न होता, अशी टीका प्रदेश भाजपने केली. ममतांनी आजच्या विरोधकांच्या बैठकीला जाणेही टाळले, याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष वेधले.
कोलकता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या विरोधातील मतांचे विभाजन करण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न होता, अशी टीका प्रदेश भाजपने केली. ममतांनी आजच्या विरोधकांच्या बैठकीला जाणेही टाळले, याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष वेधले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलाविलेल्या बैठकीला न जाता ममतांनी राज्यात शरपंजरी पडलेल्या काँग्रेस आणि माकप पक्षांना हवा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप आणि तृणमूलमध्ये काहीतरी शिजते आहे, अशी लोकांची भावना करून देत तृणमूलविरोधी मते भाजप, माकप आणि काँग्रेसमध्ये विभाजित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील जनतेने २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपलाच सत्तेवर आणण्याचा निर्णय घेतला असल्याने ममतांची ही चाल यशस्वी ठरणार नाही, असा दावाही भाजप नेत्यांनी केला. भाजपची ताकद कमी करण्याचा ममता यांचा डाव असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.