ममता बॅनर्जी पंतप्रधान बनू शकतात : भाजप नेते

वृत्तसंस्था
रविवार, 6 जानेवारी 2019

''सध्याच्या परिस्थितीत भाजपचा पराभव होऊन महाआघाडीची सत्ता आल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या दावेदार म्हणून आघाडीवर असेल''.

- दिलीप घोष, प्रदेशाध्यक्ष, भाजप

नवी दिल्ली : ''सध्याच्या परिस्थितीत भाजपचा पराभव होऊन महाआघाडीची सत्ता आल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाच्या दावेदार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर असेल'', असे पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले. तसेच ममता बॅनर्जी या देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

ममता बॅनर्जी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना घोष यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ''ममता बॅनर्जी यांना उत्तम आरोग्य आणि जीवनात यश मिळो, अशी मी प्रार्थना करतो. त्यांच्या यशस्वीपणावरच राज्याचे भविष्य अवलंबून आहे. जर कोणत्या बंगाली व्यक्तीला पंतप्रधान बनण्याची संधी असेल. तर त्या ममता बॅनर्जी असतील. चांगले काम करता यावे, यासाठी त्या निरोगी, तंदुरुस्त राहाव्यात.''

दरम्यान, राजकारणात ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधक असल्याने खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

Web Title: Mamta Banerjee can become PM says BJP leader