ममतादी तुम्ही लढा, देश तुमच्या सोबत: केजरीवाल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीविरूद्ध आवाज उठविल्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप करत बॅनर्जी यांनी आपला लढा सुरू ठेवावा देश त्यांच्या सोबत आहे, अशा प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.

राज्य सरकारला न कळवता कोलकात्यामधील टोलनाक्‍यांवर जवान तैनात केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल यांनी बॅनर्जी यांनी नोटाबंदीला विरोध केल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी लढा सुरू ठेवावा संपूर्ण देश त्यांच्या मागे असल्याचेही म्हटले आहे. तर बॅनर्जी यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बॅनर्जी विनाकारण सैन्यदलाला राजकारणात ओढत असल्याचे म्हटले आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आणि पश्‍चिम बंगालमध्ये टोल नाक्‍यांवर जवान तैनात केले जातात. याच पद्धतीचा प्रयोग गेल्यावर्षीही केला होता. गेली पंधरा वर्षे हा प्रयोग सुरू आहे, अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली होती.

याशिवाय बॅनर्जी प्रवास करत असलेले इंडिगोचे पाटनाहून कोलकात्याच्या दिशेने निघालेले विमानाचे एमरजन्सी लॅंडिंग करावे लागल्याने बॅनर्जी यांच्या जीवाला धोका असल्याचे मत तृणमूल कॉंग्रेसने व्यक्त केले आहे. मात्र केवल इंडिगोच्याच नव्हे तर अन्य दोन विमानांचेही एमरजन्सी लॅंडिंग करावे लागल्याचे सांगत याबाबत हवाई वाहतूक महासंचालक चौकशी करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.

Web Title: Mamtadi, keep up the fight. Whole nation is wid u: Kejriwal