नवजाताला स्तनपानापासून रोखणाऱ्या पित्याला अटक!

वृत्तसंस्था
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

बंधित पित्याला एका मुस्लिम धर्मगुरूने नवजात अर्भकाला मशिदीतील प्रार्थना ऐकल्याशिवाय स्तनपान करू नये असे सांगितल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालक रसिका करमार यांनी दिली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांनी बोलविले. पोलिसांनी असा प्रकार हा गुन्हा असून त्याबद्दल शिक्षा होऊ शकते, असे सांगितल्यानंतरही पित्याने त्यांचे ऐकले नाही.

कोझिकोडे (केरळ) - नवजात बालकाला स्तनपानापासून रोखणाऱ्या पित्याला पोलिसांनी अटक केल्याची दुर्मिळ घटना आज (शनिवार) समोर आली आहे.

शहरातील ईएमएस रुग्णालयात 2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजता एका अपत्याने जन्म घेतला. त्यानंतर मुस्लिम धर्म असलेल्या त्याच्या पित्याने आपल्या नवजाताला स्तनपानापासून रोखले. मशिदीमधून पहाटेची प्रार्थना ऐकू आल्याशिवाय स्तनपान देणे मुस्लिम धर्माच्या विरुद्ध असल्याचे म्हणत त्याने स्तनपानास विरोध केला. दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या सर्व प्रकारावरून पित्याला समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर पित्याने जर स्तनपानापासून रोखल्याने नवजाताचा मृत्यु झाला तर त्याची जबाबदारी माझी असेल, असा दावा केला. तसेच आपल्या पहिल्या अपत्यालाही आपण पहाटे स्तनपान किंवा अन्य कोणताही पदार्थ दिला नसून तो सुदृढ असल्याचेही सांगितले.

संबंधित पित्याला एका मुस्लिम धर्मगुरूने नवजात अर्भकाला मशिदीतील प्रार्थना ऐकल्याशिवाय स्तनपान करू नये असे सांगितल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालक रसिका करमार यांनी दिली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांनी बोलविले. पोलिसांनी असा प्रकार हा गुन्हा असून त्याबद्दल शिक्षा होऊ शकते, असे सांगितल्यानंतरही पित्याने त्यांचे ऐकले नाही. या सर्व दबावामुळे पित्याने आपल्या नवजात बालकासह पत्नीला पहाटे पाच वाजता जबरदस्तीने रुग्णालयातून हलविले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केल्याचेही वृत्त आहे.

Web Title: Man allegedly stopped wife from breastfeeding baby until prayers