पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यंगचित्र पोस्ट करणाऱ्याला अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यंगचित्र काढून ते पोस्ट करणाऱ्या आसामच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. या व्यक्तीने पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य काही नेत्यांची व्यंगचित्रे पोस्ट केली आहेत. 

करिमजंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यंगचित्र काढून ते पोस्ट करणाऱ्या आसामच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. या व्यक्तीने पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य काही नेत्यांची व्यंगचित्रे पोस्ट केली आहेत. 

modi

आसामच्या कचर जिल्ह्यातील रतनपूर येथे राहणाऱ्या जरीर अहमद बरभुया या व्यक्तीला काल (शनिवार) रात्री उशीरा अटक करण्यात आली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की जरीर अहमद बरभुया या व्यक्तीने 21 एप्रिलला व्यंगचित्र अपलोड केले होते. त्याने पंतप्रधान मोदी आणि देशातील अन्य नेत्यांचे व्यंगचित्र अपलोड केले होते. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राजेश कुमार दास यांनी कचर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केली असून, या एफआयआरच्या आधारे बरभुया यास अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Man Arrested For Allegedly Posting Cartoon Featuring PM Narendra Modi