दोन हजारांच्या नोटची छपाई करणारे अटकेत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

अमृतसर- पंजाबमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटची बनावट छपाई करणाऱया एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिखिविंद या गावात कॉम्युटर ऑपरेटर असलेले संदीप कुमार व हरजिंदर सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांचे गावात छोटेशे दुकान आहे. दुकानात असलेला संगणक, स्कॅनर व प्रिंटरच्या माध्यमातून दोघे दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई करत होते. याबाबतची माहती समजल्यानंतर दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी दोन हजार रुपयांच्या पाच बनावट नोटा व इतर साहित्य जप्य करण्यात आले आहे.

संदीप व हरजिंदर यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांनी बनावट नोटांच्या माध्यमातून कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक गुरदीप सिंग यांनी दिली.

Web Title: Man arrested for printing fake Rs 2,000 notes in Punjab