गर्लफ्रेंडचे 'ते' फोटो फेसबुकवर अपलोड केल्याने एकाला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

दोघेही जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात असताना हे दोघेही लोणावळा आणि अलिबाग येथे गेले होते. त्यादरम्यान स्टिवर्टने त्या तरुणीचे दोनदा अश्लील फोटो काढले होते.

- जयवंत संकपाळ, पोलिस निरीक्षक, चेंबूर पोलिस ठाणे

कोलकाता : एक्स-गर्लफ्रेंडचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी 31 वर्षीय व्यक्तीला अटक केली. याप्रकरणी मे 2018 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून एका पुरुषासह महिलेला पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेली ही व्यक्ती पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

facebook

याप्रकरणी 31 वर्षीय स्टिवर्ट गुहा या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. गुहा हा पश्चिम बंगालचा रहिवासी असून, तिथे त्याचे हार्डवेअरचे दुकान आहे. स्टिवर्ट गुहाने त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडचे अश्लील फोटो काढले होते. मात्र, त्यानंतर त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड केले. पीडित तरुणी चेंबूर येथील रहिवासी असून, एका खासगी बँकेत व्यवस्थापक म्हणून नोकरी करत आहे. याबाबत त्या तरुणीने पोलिसांना सांगितले, की डिसेंबर 2016 मध्ये गुहाशी पहिल्यांदा भेट झाली. तेव्हा त्याचे वडील चेंबूरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्या दोघांची यादरम्यान ओळख झाली. या ओळखीनंतर दोघांचे बोलणे आणखीनच वाढले. 

त्यानंतर दोघेही जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात असताना हे दोघेही लोणावळा आणि अलिबाग येथे गेले होते. त्यादरम्यान स्टिवर्टने त्या तरुणीचे दोनदा अश्लील फोटो काढले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तरुणीने 12 मे, 2018 ला याबाबतची लेखी तक्रार पोलिसांत दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी भा.दं.वि. आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

या तक्रारीनंतर पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील दुर्गापाडा येथून स्टिवर्टला अटक केली. त्याची 13 जून रोजी कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर मुंबईतील एका न्यायालयात 16 जूनला त्याला हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला 22 जूनपर्यंत कोठडी सुनावली, अशी माहिती चेंबूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयवंत संकपाळ यांनी दिली.

Web Title: Man arrested for uploading intimate photos of Ex girlfriend on FB