गायीच्या कत्तलीच्या आरोपाखाली व्यक्तीची हत्या 

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

सोमवार (ता.19) उत्तरप्रदेशातील पिलखुवा गावात गायीच्या कत्तलीचा आरोप ठेवून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. तेथिल जमावाने लाठ्या-काठ्यांनी मारून त्या व्यक्तीची हत्या केली तर दुसरा गंभीर जखमी आहे. मृताच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली असून, सध्या गावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पूर्णपणे पोलिस बंदोबस्त आहे. हा मोटारसायकलच्या छोट्याशा अपघातातून झालेला वाद आहे असे पोलिसांचे वृत्त आहे. या संदर्भात पोलिसांनी पाच व्यक्तींना अटक केली आहे.

पिलखुवा (उत्तर प्रदेश)- उत्तरप्रदेशातील पिलखुवा गावात गायीच्या कत्तलीचा आरोप ठेवून एका व्यक्तीची सोमवारी (ता.19) हत्या करण्यात आली. जमावाने लाठ्या-काठ्यांनी मारून त्या व्यक्तीची हत्या केली तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी आहे. मृताच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली असून, सध्या गावात तणावग्रस्त परिस्थिती आहे. गावात पूर्णपणे पोलिस बंदोबस्त आहे. हा मोटारसायकलच्या छोट्याशा अपघातातून झालेला वाद आहे असे पोलिसांचे वृत्त आहे. या संदर्भात पोलिसांनी पाच व्यक्तींना अटक केली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, काही नागरिकांनी त्यांना गोमांस घेऊन जाताना पाहिले होते. एका शेतकऱ्याने ही माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर काहीं जणांनी मिळून त्या व्यक्तीला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात  त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचे नाव कासिम (वय 45) असल्याचे समजते. तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समेदीन आहे.

या घटनेची माहिती मिळताच, सीओ पवनकुमार आणि कोतवाल अश्वनी कुमार घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर त्यांनी जखमींना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी कासीमला मृत घोषित केले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक संकल्प शर्मा, सहायक पोलिस अधिक्षक राममोहन सिंह यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: Man Beaten To Death In UP Allegedly Over Cow Slaughter Rumours