हिंदू युवा वाहिनीच्या तीन कार्यकर्त्यांना अटक 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

पोलिसांनी या तिघांची नावे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, हिंदू युवा वाहिनीचे जिल्हाप्रमुख सुनील राघव यांनी अटक करण्यात आलेले कार्यकर्ते संघटनेचे नसल्याचे म्हटले आहे. 

बुलंदशहर - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना मुस्लिम व्यक्तीच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

पहासू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोही गावातील गुलाम मोहम्मद (वय 45) याचा हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत नुकताच मृत्यू झाला होता. याप्रकरणी संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. सोही गावातील युसूफ या तरुणाने शेजारील गावातील हिंदू तरुणीला प्रेम प्रकरणातून पळवून नेले होते. त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी गुलाम मोहम्मद याला मारहाण करीत ठार केले. आता पोलिसांनी याप्रकरणी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी या तिघांची नावे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, हिंदू युवा वाहिनीचे जिल्हाप्रमुख सुनील राघव यांनी अटक करण्यात आलेले कार्यकर्ते संघटनेचे नसल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Man Beaten To Death In UP's Bulandshahr. Family Blames Hindu Yuva Vahini