म्हणून, त्याने कात्रीने कापली बायकोची जीभ

वृत्तसंस्था
रविवार, 19 ऑगस्ट 2018

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कर्नलगंज परिसरात एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची जीभ कापल्याची घटना घडली आहे. त्या व्यक्तीची पत्नी त्याला दारू पिण्यासाठी विरोध करत असे. ती त्याला सातत्याने बडबड करत असायची, म्हणून चिडलेल्या पतीने पत्नीची थेट जीभच कापली आहे. संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कानपूर- उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कर्नलगंज परिसरात एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची जीभ कापल्याची घटना घडली आहे. त्या व्यक्तीची पत्नी त्याला दारू पिण्यासाठी विरोध करत असे. ती त्याला सातत्याने बडबड करत असायची, म्हणून चिडलेल्या पतीने पत्नीची थेट जीभच कापली आहे. संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शकील अहमद(40) असे आरोपी पतीचे नाव आहे. सध्या आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या दांपत्यामध्ये सातत्याने दारू पिण्यावरून खटके उडायचे. सतत भांडणे सुरु असायची. हा प्रकार घडला त्या रात्रीही दोघांमध्ये दारुच्या व्यसनावरुन भांडणे झाली. जोरजोरात भांडण सुरू असताना संताप अनावर झालेल्या शकीलने कात्रीच्या सहाय्याने थेट पत्नीची जीभच कापली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Man Chopped Off His Wife Tongue After She Objected To His Drinking Habit